राष्ट्रीय सणांच्या पावन पर्वावर राकेश बेदमूथा यांच्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Picture of starmazanews

starmazanews

परंडा  प्रतिनिधी गोरख देशमाने दिनांक26 परंडा  शहरातील लक्ष्मी मेडिकलचे मालक तथा शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते राकेश बेदमूथा यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील दहा शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना चार रेघी २०० पानांच्या वह्या तसेच शिसपेन्सिलींचे वाटप करून समाजोपयोगी उपक्रम राबविला. वाड्या-वस्तीवरील विद्यार्थ्यांना शिक्षणात हातभार लागावा या उद्देशाने ते गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांचे औचित्य साधत सातत्याने शैक्षणिक साहित्य वाटप करीत आहेत.

यापूर्वीही त्यांनी काही शाळांच्या गरजा लक्षात घेऊन त्या शाळांना साऊंड बॉक्स, रंगकामासाठी आर्थिक मदत, थोर महापुरुषांचे प्रेरणादायी फोटो उपलब्ध करून दिले असून, शाळेची जशी मागणी असेल त्याप्रमाणे मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा मिळण्यास मोठा आधार मिळत आहे.

या वर्षी पवारनगर, श्रीधरवाडी, उंडेगाव बावकरवस्ती, जामगाव, शिरगीरवाडी, गोसावीवाडी, जगदाळवाडी, पारेवाडी, भिलारेनगर व लोहारा येथील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना चार रेघी वह्या व शिसपेन्सिलींचे वाटप करण्यात आले.

विशेष म्हणजे, सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पुरग्रस्त शाळांमधील तब्बल २८० विद्यार्थ्यांना त्यांनी उबदार ब्लँकेटचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले होते. शिक्षणाची आवड व सामाजिक भान यांचा सुरेख संगम साधत राकेश बेदमूथा यांनी उभारलेला हा सेवायज्ञ समाजात प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!