स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी दिनांक मंगळवार 27/01/2026 रोजी परंडा पोलिस स्टेशन हद्दीतील रुई तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथे पहाटे 5:50 वाजता 4-5 चोर पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून चोरीच्या उद्देशाने आलेले आहेत आणि गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या नदीपात्रातील मोटरची केबल चोरून इतर आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून निघून गेले आणि एक आरोपी ती केबल जाळून त्याच्यातील तांब्याची तार वेगळी करत शेजारील शेतामध्ये बसला होता. गावातील संतोष व्यवहारे यांना एका शेतामध्ये जाळ दिसला असता त्यांनी त्या व्यक्तीला जाऊन विचारना केली असता तो गडबडला,घाबरला आणि उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला.की माझे शेत आहे नांगरायचे आहे.त्यामुळे तुराट्या जळत आहे असे तो सांगत होता. त्यांना शंका आली कारण त्यांना माहीत होते शेत कोणाचे आहे आणि त्यामुळे त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ही माहिती तात्काळ गावचे माजी उपसरपंच सुमित राजेंद्र लिंकरपाटील यांना कळवली आणि त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून सर्व गावांला आणि परंडा पोलीस स्टेशनला कळवली,त्यामुळे तात्काळ रुई ग्रामस्थ व परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले साहेब यांच्या आदेशान्वये परंडा पोलीस स्टेशनची नाईट राउंडची गाडी घटनास्थळी दाखल झाले.गावकरी घटनास्थळी दाखल झालेले आहेत हे लक्षात येताच,तो चोर शेजारील ऊसामध्ये पळून गेला;परंतु गावकऱ्यांनी एकत्र येत पाठलाग करून ऊसाच्या आतमध्ये जाऊन चोराला पकडले आणि त्याच्याकडील टू व्हीलरसह पोलिसांच्या स्वाधीन केले.सदर घटनास्थळी सदर बीटचे बीट अंमलदार विश्वनाथ शिंदे, भुजंगराव आडसूळ,सादू शेवाळे, पोलीस पाटील विलास पाटील, माजी उपसरपंच सुमित लिंकर पाटील, संतोष व्यवहारे यांच्यासह रुई ग्रामस्थ उपस्थित होते.
रुई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी व पोलीस पाटील यांच्या प्रयत्नातून गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी राबविली जात आहे.
आजवर रुई गावात ग्रामसुरक्षा यंत्रणेचा विविध सूचना देण्यासाठी 17 वेळा वापर करण्यात आला आहे.
*धाराशिव जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद धाराशिव यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या ग्राम सुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील 618 गावे सहभागी आहेत.जिल्ह्यातील 6 लाख नागरिक यंत्रणेत सहभागी आहेत.आजवर जिल्ह्यात 9019 वेळा यशस्वी वापर करण्यात आला आहे.*
संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600/9822112281 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जात असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होतआहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेचा यशस्वी वापर करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडून देण्यात आले आहेत.
*ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट*
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.
गावातील कार्यक्रम / घटना विना विलंब नागरीक/ग्रामस्थांना एकाच वेळी कळवणे.
अफवांना आळा घालणे.
प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.
पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.
*ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये*
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा
गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत
संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600/9822112281
यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.
संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.
दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता , ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.
नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात
नियमाबाह्य दिलेले संदेश/ अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.
एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.
वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या 10 किमी परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.
घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही,तोपर्यंत रिंग वाजते.
संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.
चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.
गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.
सरकारी कार्यालये/ पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य होत आहे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









