(रा गे शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप संपन्न
तालुका गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित)
स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे
परंडा प्रतिनिधी दि. 22 जानेवारी 2026 राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणे विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणे जात-पात न पाहता आम्ही सर्व भारतीय आहोत याची जाणीव निर्माण करणे असून विद्यार्थ्यांनी देशांमध्ये असमानता अंधश्रद्धा भ्रष्टाचार अशा घटना घडत आहेत अशा घटना घडू नये यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून पुढाकार घेऊन या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन परंडा तालुका गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयाच्या मौजे बोडखा तालुका परंडा या गावी आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये निरोप समारंभाच्या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना केले ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली दि 16 जानेवारी ते 22 जानेवारी 2026 दरम्यान श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे बोडका या गावी विशेष श्रमसंस्कार शिबिर पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकास यावर शाश्वत युवा विशेष भर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने तर व्यासपीठावर बोडखा गावचे सरपंच विठ्ठल करडे उपसरपंच नागनाथ काकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश चांदणे सहशिक्षक नागनाथ उकिरडे महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे मराठी विभाग प्रमुख डॉ गजेंद्र रंदील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ अरुण खर्डे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ दीपक तोडकरी प्रा जगन्नाथ माळी यांची उपस्थिती होती.

या शिबिरामध्ये विद्यार्थी व समाज परस्पर संबंध या विषयावर डॉ शहाजी चंदनशिवे यांनी तर वृक्षारोपण काळाची गरज या विषयावर डॉ सचिन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा फायदा या विषयावर तालुका कृषी अधिकारी एन एन लांडगे, समाज प्रबोधन ह भ प अशोक महाराज पाटील, बँकांचे कृषी विषयक धोरण या विषयावर डॉ अरुण खर्डे यांनी मार्गदर्शन केले. दिनांक 21 जानेवारी रोजी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भगवंत ब्लड बँक बार्शी यांच्या मार्फत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सात दिवसाचा वृत्तांत कार्यक्रमाधिकारी डॉ दीपक तोडकर यांनी सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डी जे पवार आणि कु. सानिका गायकवाड या विद्यार्थिनींनी केले याप्रसंगी प्रतिक्षा लिमकर प्रतीक्षा गवारे तसेच सहशिक्षक नागनाथ उकिरडे यांनीही आपले मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप उप प्राचार्य डॉ महेशकुमार माने यांनी केला. शिबिर यशस्वी करण्यासाठी सह कार्यक्रमाधिकारी म्हणून डॉ अरुण खर्डे डॉ संभाजी गाते डॉ विशाल जाधव डॉ सचिन चव्हाण डॉ शहाजी चंदनशिवे डॉ अमरसिंह गोरे पाटील व प्रा डॉ गजेंद्र रंदील यांनी तर कार्यक्रमाचे सहाय्यक म्हणून शिक्षकेतर कर्मचारी उत्तम माने संतोष राऊत धनंजय गायकवाड व श्रीमती सुनंदा कोठुळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक जगन्नाथ माळी यांनी मानले.
👉 🖊️🖊️🖊️बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक :-रियाज पठाण 9405749898/
9408749898🙏🙏🙏
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









