स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने / प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे
परंडा प्रतिनिधी दिनांक 12/01/2026
वंचित बहुजन आघाडी पक्षा ची धाराशिव जिल्हा नूतन कार्यकारिणी प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आली यामध्ये परंडा येथील धनंजय सोनटक्के यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी ते क्रियाशील कार्यकर्ता आहेत गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केले आहे त्यामुळे त्यांना पक्षाने यापुर्वी जिल्हा महासचिव म्हणून काम करण्याची संधी वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी देण्यात आली होती.यांच्या याच कार्य काळामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर ,प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर पक्षाच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका प्रा. अंजलीताई आंबेडकर पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यामध्ये मोठ मोठे कार्यक्रम आयोजित केले होते.
त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत धाराशिव जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे .
प्रदेश महासचिव प्रा.किसन चव्हाण यांनी सत्तावीस पदाधिकाऱ्यांची जम्बो धाराशिव जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे यामध्ये परंडा येथील मोहनदादा बनसोडे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी तर कृष्णा जाधव यांची जिल्हा संघटक पदी वर्णी लागली आहे.भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी या कार्यकाळात पक्षामध्ये प्रथमच परंडा तालुक्याला जिल्हाध्यक्ष पदाची संधी प्राप्त झाली आहे परंडा तालुका वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सक्रिय असून विविध आंदोलने पक्षाचे कार्यक्रम सक्रियपणे राबवून पक्षाची आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
उत्तम संघटन कौशल्य शांत संयमी नेतृत्व विविध विषयांवरचा असणारा अभ्यास वक्तृत्व सर्व समाज घटकांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी या सर्व काम करण्याच्या कार्यशैलीमुळे धनंजय सोनटक्के यांच्यावरती जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे ते वंचित बहुजन आघाडी पक्षा चा विचार संकल्पना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कायम तत्पर असतात काम करणारा ॲड.बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी पक्षाचा निस्वार्थ कार्यकर्ता हीच त्यांची ओळख आहे वंचित बहुजन आघाडी महिला,युवक,कामगार,भटके विमुक्त सर्व घटकांना घेऊन ते काम करतील त्यांच्या निवडीमुळे वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण रणबागुल ,राज्य कार्यकारिणी सदस्य तथा धाराशिव जिल्हा प्रभारी अविनाश भोसीकर ,मराठवाडा महासचिव तथा जिल्हा प्रभारी ॲड.रमेश गायकवाड ,प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी राज्याचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद ,प्रदेश प्रवक्ते ॲड.अरुण जाधव ,फुले आंबेडकर विद्वतसभेचे मार्गदर्शक प्रा.भास्कर भोजने ,फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक प्रा.डॉ शहाजी चंदनशिवे ,धाराशिव मा.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शिंदे ,मारुती बनसोडे ,सुभाष वाघमारे सर ,वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अनुराधा लोखंडे वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण ,वंचित बहुजन जनरल कामगार युनियन आघाडी जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे त्याचबरोबर सर्व मित्र परिवार यांनी धनंजय सोनटक्के यांची धाराशिव जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने अभिनंदन करत पुढील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत धनंजय सोनटक्के यांच्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या अनुषंगाने सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
वंचित बहुजन आघाडी पक्ष संघटन संघटनात्मक बांधणी मजबुत करून सर्व समाज घटकांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडी पक्षाची विचारधारा तळाकळापर्यंत पोहोचविणे संभाव्य जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक वंचित बहुजन आघाडी सक्षमपणे धाराशिव जिल्ह्यामध्ये लढणार – धनंजय सोनटक्के
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.











