मा. आ. राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते हिंदवी समाचार दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews



स्टार माझा न्यूज बार्शी प्रतिनिधी,
राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना प्रणित, हिंदवी समाचार दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन माजी आमदार राजेंद्र राऊत व नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार्शी नगर परिषदेसमोरील शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता मॉंसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.



ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना 2021 मध्ये करण्यात आली. राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे राज्य प्रसिद्ध प्रमुख व हिंदवी समाचार चे मुख्य संपादक धिरज शेळके यांच्या हिंदवी समाचार दिनदर्शिका 2026 चा प्रकाशन सोहळा मा. आ. राजेंद्र राऊत व नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष रोहित पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शितल गोपलकर, ऍड. राजश्री डमरे – तलवाड, अपर्णा मिठे, संतोष सूर्यवंशी, संजय बारबोले, बाबासाहेब कापसे, सिद्धार्थ बसवंत नगरसेवक दास मस्के, मदन गव्हाणे, भैय्या बारंगुळे, विजय राऊत,  अजय पाटील, ऍड. गणेश हांडे, उमेश काळे, राजाभाऊ पैकेकर, यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, पत्रकार, विविध संघटनेचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कोकाटे यांनी केले. प्रस्तावना विजय राऊत यांनी केली तर उपस्थितांचे आभार ऍड. आकाश तावडे यांनी मानले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!