जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews


परंडा प्रतिनिधी  गोरख देशमाने,

परांडा दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन परंडा तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे साहेब,परंडा केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय महादेव विटकर,जयदेव गंभीरे, आदिकराव शेळवणे,रामदास होते,श्रीमती मनिषा जगताप मॅडम,बेडके मॅडम,ठोंबरे सर, पिरामल फाउंडेशन च्या सदफ परवीन,रोहित गुप्ता,मुख्याध्यापक रवींद्र कापसे शालेय समिती अध्यक्ष परमेश्वर बोराडे, उपसरपंच गणेश कोकाटे,गोकुळ गरड पोलीस, पाटील महादेव मोरे, ग्रामसेवक अशोक शिंदे,इर्शाद पटेल,मिटू लोकरे, परसराम कोळी, प्रविण गरड उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सदरील कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख महादेव विटकर सर,बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश कुकडे, साधनव्यक्ती मनिषा जगताप यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीची माहिती झाली तसेच व्यवहारिक ज्ञान , गणित हिशोब , संवाद कौशल्य ,  सहकार्य , स्वावलंबनाचे प्रत्यक्ष धडे अनुभवता आले .

सदरील मेळाव्यामध्ये 30 विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ व वस्तूचे स्टॉल उभारले होते . यामध्ये पाणीपुरी , उडीद वडा , भजे ,  समोसा , मंचुरियन ,  पावभाजी, जिलेबी , कलाकंद , पेढे ,  इडली, आप्पे , दहीदपाटे,  वडापाव , ढोकळा ,भेळ ,पॅटीस ,भाजीपाला ,  लेडीज शॉपी इत्यादी स्टॉल विद्यार्थ्यांनी मांडले होते. सदरील बाल आनंद मेळाव्यातून 20 हजार रुपयांची खरेदी,विक्री करण्यात आली.यावेळी विद्यार्थी , पालक व शिक्षक सर्व ग्रामस्थ , प्रमुख पाहुणे यांनी या बाल मेळाव्याचा आनंद घेतला. ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ खरेदी करून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला.


या कार्यक्रमाप्रसंगी गावातील नागरिक,महिला भगिनी,तरुण मंडळ,पालक, शिक्षण प्रेमी नागरिक तालुक्यातील शिक्षक बांधव मोठया प्रमाणात उपस्थित राहिले.
    या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद शाळेतील माजी विद्यार्थी चि.प्रेम विजय मोरे हा भारतीय सैन्यामध्ये दाखल झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री रवींद्र कापसे सर यांनी केले तर आभार शाळेचे शिक्षक श्री दिपक मिरकले सर यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती तब्बसुम पटेल मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी शिक्षक , पालक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद*

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!