परंडा( प्रतिनिधी) गोरख देशमाने,
परंडा तालुक्यातील मौजे ढगपिंपरी ता.परंडा येथील दिव्यांग विजय विठ्ठल हावळे हे दिनांक 22/11/ 2025 रोजी तहसील कारल्यासमोर आमरण उपोषणाला बसले असता त्यांच्या प्रकरणाचे दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांनी शहानिशा करून माहिती घेऊन प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा उपोषणकर्त्या समवेत चर्चा करून निर्णय घेतला.
ढगपिपरी येथे राहते घर जागेवर केलेले अतिक्रमण काढावे अशी मागणी अर्जदार विठ्ठल हावळे हे वारंवार करत आले परंतु यांच्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे त्यांना तहसील कार्यालयासमोर उपोषण करावे लागले या संदर्भात प्रशासन अधिकारी नायब तहसीलदार विजय बाडकर यांच्या दालनामध्ये या मुद्द्यावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली या वेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी अजय माळी दिव्यांग संघटना अध्यक्ष तानाजी घोडके पत्रकार फारुक शेख विजय मेहर यांच्या समवेत चर्चा करण्यात आले तहसीलदार यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी पंचायत समिती व ग्रामसेवक सरपंच यांना सदर चौकाची साथ अहवाल सादर करून निर्णय घेऊ असे लेखी घेऊन सदरील उपोषण पाणी पाजून स्थगित करण्यात आले.
यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष तानाजी घोडके दिव्यांग उद्योग समूहाचे तालुकाध्यक्ष तानाजी सांगडे, उपाध्यक्ष अशोक भराटे समाजसेवक कानू सरपणे , गणेश जाधव,पत्रकार फारुख शेख सरपंच बप्पा काळे , ग्रामविकास अधिकारी प्रचाडे यांच्या उपस्थितीमध्ये लेखी आश्वासनानंतर सदरील उपोषण दिव्यांग उद्योग समूहाच्या मध्यस्तीने उपोषण यांना घेतले.
चौकट: सदरील प्रकरणाचा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सरपंच व संबंधित अधिकारी यांनी दहा ते पंधरा दिवसांमध्ये लेखी पुरावा दिव्यांग हावळे व दिव्यांग संघटना यांना देण्यात येईल असे लेखी पत्रात सांगण्यात आले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.











