रुग्ण व नातेवाईकांच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान.
स्टार माझा न्यूज, परंडा (प्रतिनिधी – गोरख देशमाने) | दिनांक : 22 डिसेंबर
दृष्टी कमी होण्यामागे मेंदूतील गाठ कारणीभूत
परंडा येथील जाकीर काझी यांच्या मेंदूत मागील सहा महिन्यांपूर्वी गाठ निर्माण झाली होती. या गाठीमुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ लागला होता. दिवसेंदिवस दृष्टी कमी होत असल्याने त्यांनी अनेक नेत्रतज्ज्ञांकडे तपासण्या केल्या, मात्र ठोस निदान होत नव्हते.
तपासणीत गंभीर बाब उघड
त्यानंतर कुटुंबीयांनी मेंदूविकार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला. बार्शी व सोलापूर येथील डॉक्टरांकडे तपासण्या केल्यानंतर मेंदूच्या खाली, डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या दोन नसांपैकी एक नसे फुटून रक्त गोठल्याने गाठ तयार झाल्याचे निदर्शनास आले. ही गाठ काढणे अत्यावश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बार्शीतच मिळाली अत्याधुनिक उपचार सुविधा
मेंदूवरील जटील शस्त्रक्रिया प्रामुख्याने पुणे किंवा मुंबई येथे होत असल्याने रुग्ण व नातेवाईक चिंतेत होते. मात्र बार्शी येथील जगदाळे मामा धर्मादाय रुग्णालयात प्रसिद्ध मेंदू व मणक्याचे तज्ज्ञ डॉ. किशोर गोडगे हे अशा किचकट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करतात, अशी माहिती मिळाल्याने जाकीर काझी यांना तेथे दाखल करण्यात आले.
ट्रान्सफेनॉयडल पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया
सर्व वैद्यकीय अहवाल तपासल्यानंतर डॉ. किशोर गोडगे यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेत 100 टक्के यशस्वी होण्याची खात्री दिली. त्यानुसार दिनांक 8 डिसेंबर रोजी मेंदूच्या पिट्युटरी ग्लॅन्डवरील ट्रान्सफेनॉयडल पद्धतीने जटील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
वैद्यकीय पथकाचे मोलाचे सहकार्य
या शस्त्रक्रियेसाठी डॉ. कांदे, श्रीकांत सोरेगावकर, हेमंत लांडे, नितीन इंगोले, सुजित कुंभारे, विनोद घोणे, महेश कुलकर्णी, अभिजित क्षीरसागर तसेच इतर वैद्यकीय व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया
यावेळी डॉ. किशोर गोडगे यांनी माहिती दिली की, पूर्वी अशा शस्त्रक्रियांसाठी मोठा खर्च व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत बार्शी येथील जगदाळे मामा धर्मादाय रुग्णालयात मेंदू, हृदय व हाडांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात आहेत.
डॉ. किशोर गोडगे यांचा सत्कार
शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल रुग्ण व नातेवाईकांच्या वतीने डॉ. किशोर गोडगे यांचा शाल, पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जुल्फीकार काझी, नासेर काझी, जहांगीर मोमीन, आसिफ पठाण, मुस्तेजाब काझी, अखलाक काझी, सोहेल काझी, जियान काझी, सैफ काझी, जैद काझी आदी उपस्थित होते.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










