⭐ स्टार माझा न्यूज, बार्शी (प्रतिनिधी) – दिनांक : 11/12/2025
बार्शी तालुका पोलिसांनी आज धडाकेबाज कारवाई करत एका इसमाच्या हातातून देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई आज सकाळी सुमारे 08.01 वाजता करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार अरसलान निलाजी जमादार हा इसम टांगे, संजयनगर, तेरना नं. आरोली (जि. सोलापूर) येथे राहणारा असून तो संशयास्पद रीतीने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर पोलिसांनी कडवाळ रोड परिसरात त्याला अडवून झडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून बेकायदा पिस्तुल, एक जिवंत काडतूस, पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रसन्न यावलकर आणि उपविभागीय अधिकारी श्री. अशोक सावकार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे तसेच पोलीस हवालदार कनंगावकर, पोलीस सुरेश बिडवे, पोलीस राहुल बांदर, पोलीस युवराज गायकवाड यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई राबवली.
आरोपी पिस्तुल कोणत्या कामासाठी बाळगत होता, त्याचा कोणत्या गटाशी संबंध आहे, तसेच शस्त्राचा पुरवठा कुठून झाला याबाबतचा तपास सुरू आहे. आरोपीवर पोलिसांनी योग्य कलमांन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









