परंडा (प्रतिनिधी): गोरख देशमाने.
परंडा नगरपरिषद निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, इच्छुक उमेदवारांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सात लाख ५० हजार रुपये, तर सदस्य पदासाठी दोन लाख ५० हजार रुपये एवढी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
🗓️ अर्ज भरण्याची प्रक्रिया
नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवार, दिनांक १० नोव्हेंबरपासून ते १७ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
१८ नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी, तर २१ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
२४ नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार असून, त्यानंतर उमेदवारांना फक्त आठ दिवसांचा प्रचाराचा कालावधी मिळणार आहे.
🗳️ मतदान व मतमोजणी
मंगळवार, २ डिसेंबर रोजी मतदान, तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
फक्त बावीस दिवसांवर मतदानाची घटिका येऊन ठेपली असून, प्रचाराचा रंग आता चढू लागला आहे.
📜 अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केल्याची पोच पावती अनिवार्य ठेवण्यात आली आहे.
या प्रमाणपत्राशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
👩💼 आरक्षणाचे स्वरूप
परंडा नगरपरिषदेत एकूण २० सदस्य पदे असून अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
एकूण १० प्रभाग, प्रत्येकी २ सदस्य
महिलांसाठी राखीव जागा – १०
नागरिकांचा मागास प्रवर्ग – ५ (त्यापैकी ३ महिला)
अनुसूचित जाती – ३ (त्यापैकी २ महिला)
सर्वसाधारण प्रवर्ग – १२ (त्यापैकी ५ महिला)
👥 परंडा शहरातील मतदारसंख्या
परंडा शहरात एकूण १७,२३७ मतदार नोंदवले गेले आहेत.
यामध्ये ८,६३२ पुरुष, ७,८३८ महिला, आणि ३ इतर मतदार आहेत.
📱 मतदारांसाठी सुविधा
मतदारांना आपले नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुबार नाव असलेल्या मतदारांकडून लेखी स्पष्टीकरण घेतले जाणार असून, मतदान केंद्रावर दिव्यांग, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.
🗣️ जनजागृती उपक्रम
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🖋️ बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










