तीन वर्षांच्या संघर्षानंतर अखेर सत्याचा विजय!

Picture of starmazanews

starmazanews



रमिज अहमद व त्यांच्या कुटुंबाची निर्दोष सुटका; खोट्या आरोपांचा भंडाफोड.

पुणे (प्रतिनिधी) सोमनाथ गायकवाड : तब्बल तीन वर्षांच्या न्याययुद्धानंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे! १७ सप्टेंबर २०२२ रोजी दाखल झालेल्या खोट्या तक्रारीनंतर अखेर पुणे न्यायालयाने रमिज अहमद आणि त्यांच्या कुटुंबाला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केलं आहे.



⚖️ खोट्या प्रकरणाची सुरुवात

१९ डिसेंबर २०१९ रोजी रमिज अहमद यांचा विवाह सना कौसर रमिज अहमद यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांतच कौटुंबिक किरकोळ वादातून मोठं प्रकरण उभं राहिलं. फिर्यादी सना व तिचा भाऊ सरफराज रफिक शेख यांनी रमिज व त्यांच्या कुटुंबावर विविध खोटे आरोप लावत ४९८(अ), ३२४, ३२३, ५०४, ३५४ सह ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला.

एफआयआरमध्ये हुंडा मागणी, शारीरिक छळ, सांडशीने जाळणे अशा गंभीर आरोपांचा उल्लेख होता. मात्र, तपासात कोणताही वैद्यकीय अहवाल, पुरावा किंवा जखमेचे प्रमाणपत्र सादर करण्यात आले नाही. साक्षीदारांच्या साक्षीतही विरोधाभास व खोटेपणा आढळून आला.



🏛️ न्यायालयाचा स्पष्ट निष्कर्ष

न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट नमूद केले की — फिर्यादी सना कौसर आणि सरफराज रफिक शेख (रा. एमपायर लँडमार्क, साळुंके विहार) यांनी पोलिस व न्यायालयीन कारवाईचा वापर वैयक्तिक वैरासाठी केला. त्यांनी बनावट कथानकाद्वारे न्यायालयाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयाने हेही नमूद केले की, रमिज अहमद आणि त्यांचे कुटुंब स्वच्छ प्रतिमेचे असून त्यांनी तपासात पूर्ण सहकार्य केले. तसेच सरफराज रफिक शेख हे भारतीय न्यायव्यवस्थेची थट्टा करत असल्याचंही नमूद केलं आहे.

३५४ कलमान्वये कोणतेही पुरावे, जप्त वस्तू किंवा साक्ष नसल्याने प्रॉसिक्यूशन कोणताही आरोप सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले.


💬 रमिज अहमद यांची प्रतिक्रिया

रमिज अहमद म्हणाले,

> “ही सत्य आणि न्यायाची जिंक आहे. या खोट्या आरोपांनी आमचं सामाजिक जीवन उद्धवस्त झालं, पण आम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आणि अखेर सत्याचा विजय झाला. या प्रकरणामुळे आम्हाला मानसिक त्रास झाला, आमची प्रतिमा समाजात मलिन झाली, पण शेवटी न्याय मिळाला.”





⚖️ वकिलांचे मत

या खटल्यात ऍडव्होकेट किरण चव्हाण, वकील अफरोज शेख आणि असीम सैय्यद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी सांगितले —

> “हा निकाल केवळ रमिज अहमद यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर समाजासाठी एक संदेश आहे की, खोट्या तक्रारींनी कुणाचंही आयुष्य उद्धवस्त होऊ नये. सत्याला वेळ लागतो, पण ते नेहमीच जिंकतं.”




🌟 समाजासाठी संदेश

या निकालाने केवळ रमिज अहमद यांच्या कुटुंबाला दिलासा मिळालेला नाही, तर समाजालाही एक स्पष्ट संदेश मिळाला आहे —

> “खोटे आरोप कितीही गाजले तरी सत्याला आवाज द्यायचा असतो, आणि शेवटी न्यायालयीन प्रक्रियेत सत्यच टिकतं.”





📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!