कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षण अभ्यासक्रम चे उद्घाटन संपन्न.
आयटीआयमध्ये विश्वकर्मा कारागिरांच्या उपस्थितीत अभ्यासक्रमांची सुरुवात
परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने परांडा दिनांक ८- येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे ३ महिन्याचे अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षणाचे एकुण ६ अभ्यासक्रम चे उद्घाटन दिनांक ०८ रोजी दुपारी ३:३० वाजता भारत देशांचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील युवकांना रोजगार आणि उद्योगात रोजगारक्षम करण्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे एकुण ६ अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून चालू वर्षात ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, पुढील वर्षापासून ही संख्या १ लाख प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा संकल्प कौशल्य विभागाने केला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील संस्था व्यवस्थापन समित्या (IMC) स्थानिक पातळीवर हे अभ्यासक्रम चालविणार आहेत. त्यामुळे शिक्षणाचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व बाबींमध्ये स्थानिक सहभाग व उत्तरदायित्व वाढणार आहे.
कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल यांच्या प्रत्येक ट्रेडला ३० विद्यार्थ्यांच्या बॅचद्वारे तब्बल १८० विद्यार्थी-उमेदवारां ना रोजगारक्षम प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच नोकरीची संधीही उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, अत्याधुनिक कोर्सेसचे ज्ञान मिळणार असून, त्यातून संबंधितांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार स्वतःचा अथवा उद्योग-व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्था व्यवस्थापन समिती चे सदस्य महावीर काशिद हे होते तर उद्घाटक म्हणून विश्वकर्मा लाभार्थी तानाजी घोडके हे होते.
या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमानंतर संस्थेतील सर्व ०६ रोजगारक्षम अभ्यासक्रम यामध्ये सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियन, मल्टीस्किल टेक्निशियन होम एप्लिन्सेस,इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक सोल्युशन, हॅण्ड एम्ब्रॉईडरी, फिटर फॅब्रिकेशन, असिस्टन्स मॅन्युअल अर्क वेल्डिंग या अभ्यासक्रमाचे उद्घाटन विश्वकर्मा लाभार्थी तानाजी घोडके यांच्या हस्ते करण्यात आले
हा कार्यक्रम पार पडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी गटनिदेशिका महानंदा काळे, शिल्प निदेशक रतिकांत पवार, नितेश फाळके, कल्लेश भोसले,रामेश्वर जाधवर, शुभम पाटील, भाग्यश्री मोहरे, सुरेखा जाधव, वरिष्ठ लिपिक सुनील सोमवंशी कनिष्ठ लिपीक प्रद्मुन डाळिंबकर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.