परंडा: प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा तालुक्यातील शेळगाव, आनाळा, पिठापुरी, खासगाव, जाकेपिपरी, ढगपिपरी, बृम्हगाव, जवळा, खासापुरी, आलेश्वर, आवरपिपरी इत्यादी गावांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय ए) वतीने अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत किटचे वाटप करण्यात आले.
खासदारांनी पाठवलेले मदत किट
वाटपाचा प्रारंभ: यावेळी दिलीप वळसे पाटील व शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पाठवलेले मदत किट थेट प्रभावित गावांमध्ये पोहोचवले गेले. प्रत्येक गावात राहणाऱ्या गरजू नागरिकांना अन्नधान्य, साहित्य व अन्य अत्यावश्यक वस्तू वितरित करण्यात आल्या.
आयोजक व उपस्थित: रिपाइं महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव संजय कुमार बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम यशस्वी झाले. तालुका अध्यक्ष दादासाहेब सरवदे, आय टी शेल, जिल्हा अध्यक्ष आकाश बनसोडे, माजी ता अध्यक्ष फकिरा दादा सुरवसे, बाबा गायकवाड, जयराम साळवे, बापू हावळे, उत्तम ओव्हाळ, सजिवन भोसले, दिपक ठोसर, भास्कर ओव्हाळ, लालासाहेब भालेराव, रामा ओव्हाळ, धनाजी यसवद, लझ्मन सरवदे आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रभावित नागरिकांचा आनंद: मदत किट मिळाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली. गरजू नागरिकांनी उपस्थित नेत्यांचे आभार मानले व त्यांच्या पुढील मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.