स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने, ता.२३ तालुका व शहर परिसरात शारदीय नवरात्रोत्सवा निमित्त तालुका व शहर परिसरात देवीच्या विविध ठिकाणी असलेल्या मंदिरात सोमवारी ता.२२ रोजी विधीवत पुजाअर्चा करुन घटस्थापना करण्यात आली. शहरातील ऐतिहासिक भवानी शंकर मंदिर ,गारभवानी,भगवतीआई मंदिरात परंपरेनुसार धार्मिक उत्साहात घटस्थापना करण्यातआली.
शहरातील भवानी शंकर मंदिरात कोल्हापूरच्या अंबाबाईची प्रतिकृती असलेल्या अंबाबाईची विधीवत पारंपरिक,धार्मिक पद्धतीने पुजा करुन मंदिराचे विश्वस्त किशोर बैरागी, कपिल बैरागी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता घटस्थापना करण्यात आली.अतिवृष्टीने पुर्ण मंदिरात पाणी शिरले होते.भाजपा नेते सुजितसिंह ठाकुर यांच्या पुढाकाराने जेसीबीने चर खोदुन मंदिरातील पाण्याचा निचरा करण्यात आला.यावेळी समरजितसिंह ठाकुर,व्हाईस आॕफ मीडियाचे जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश काशीद,प्रशांत मिश्रा,व्यंकटेश दिक्षीत,बाॕबी काशीद,किशोर बैरागी आदिसह नागरीक उपस्थित होते. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरावर आकृर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.नवराञीनिमित्त दररोज हंसराज महिला भजनी मंडळाचे दुपारी ४ ते ६.३० वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होणार आहे.या मंडळाची ७० वर्षापासुन अखंड सेवेची परंपरा सुरु आहे.शुक्रवार ता.२६ रोजी देवीची १००० नावे उच्चारुन कुंकुमार्चन सोहळा कार्यक्रम होणार आहे.मंगळवारी ता.३० रोजी देवीचा वैदीक हावन,पुण्याह वाचन,सप्तशती पठण,कुष्मांड बली कार्यक्रम होणार असुन सकाळी ९.०५ ते १२.०७ वाजता पुर्णाहुती होणार आहे.या कालावधीत महिला वर्ग विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेणार आहेत.देवीच्या मंदीरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते.तसेच बार्शी मार्गावरील,गारभवानी मंदिरात मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली.या मंदिर परिसरातच विजयादशमीदिवशी मान्यवंराच्या हस्ते विधिवत शस्ञपुजा करुन “सिमोंल्लघन” खेळण्यात येते.या ठिकाणी दररोज आराधी मंडळ जागर करणार आहेत.मंगळवार पेठेतील,रेणुका मातेचे ठाण असलेल्या भगवतीआई मंदिरात घटस्थापना करण्यात आली. शहरात ,सार्वजनिक मंडळाचे भाविकभक्त तुळजापूर येथुन भवानी ज्योत आणुन प्रतिवर्षी प्रमाणे देवीची प्रतिष्ठापना करतात माञ मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांना महापुर आल्याने मार्ग बंद पडलेले आहेत. नवराञोत्सानिमित्त बालगोपाळ,आबालवृध्द ,महिलावर्ग नऊ दिवस मोठ्या भक्तीभावाने देवीची उपासना करुन,पायातील वाहन पाळतात.नवराञोत्सानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तुळजापुरहुन भवानी मातेची ज्योत घेऊन परंडा शहरातुन करमाळा तालुक्याकडे जाणाऱ्यां युवकांची संख्या मोठी असते माञ सोमवारी राञभर झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे परंडा-बार्शी मार्गावर आसलेल्या नद्यांना महापुर आल्याने हा मार्ग बंद पडला आहे.त्यामुळे अनेकजण अडकुन पडले आहेत.पाणी ओसरल्याशिवाय गावाकडे ज्योत जाणार कशी !

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.