परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने . परंडा शहरातील कुर्डूवाडी नाका जुना कात्राबाद रस्ता पाणी समस्येबाबत नगरपरिषदेला निवेदन
दि.29/08/2025
परंडा : शहरातील कुर्डूवाडी नाका जुना कात्राबाद रस्ता या भागातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून नळाला पाणी मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. कधी पाणी आले तरी अत्यंत कमी दाबाने येते. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या परंडा शहर अध्यक्ष सोहेल मुजावर शहर उपाध्यक्ष :- तय्यब मुजावर
अदनान मुजावर, सयदोद्दीन मुजावर,संतोष खताळ,साजेद कागदी,रफीक पटेल,रियाज शेख
महेबुब पठाण.यांच्या वतीने आज नगरपरिषद परंडा येथे निवेदन सादर करण्यात आले. ही बाब नागरिकांवरील अन्यायकारक आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
नागरिकांची मागणी आहे की, तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करून नियमित व पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.