परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
पत्रकारांवर वाढती दडपशाही; सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
परंडा प्रतिनिधी दिनांक 28.
पत्रकारांवर अन्याय, दडपशाही व खोट्या कारवाईच्या घटना वाढीस लागल्याने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परंडा तालुक्यातील पत्रकारांनी याविषयी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पत्रकारांवर खोट्या गुन्ह्यांची नोंद
अवैध धंद्यांबाबत पत्रकार चंद्रमणी गायकवाड यांनी भूम येथे स्थानिक पोलिसांना प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात एनसी दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतकेच नव्हे तर त्यांना एफआयआरची प्रतही देण्यास नकार देण्यात आला.
तुळजापूरमध्ये धमकीची नोंद
दरम्यान, तुळजापूर तालुक्यातील पत्रकार आनंद कंदले यांच्याविरोधातही पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देत “बघून घेऊ” असे वक्तव्य झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे पत्रकारांवर हल्ला किंवा जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न पत्रकारांकडून उपस्थित करण्यात आला.

पत्रकारांचे म्हणणे
पत्रकारांनी सांगितले की, पत्रकारितेला लोकशाहीतील चौथा स्तंभ मानले जाते. सत्य वार्तांकन करणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र सतत खोटे गुन्हे, धमक्या व दडपशाहीमुळे पत्रकारितेवर गदा येत असून लोकशाही धोक्यात येत आहे.
पत्रकारांच्या मागण्या
पत्रकारांनी शासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत :
1. पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय, धमक्या व खोट्या गुन्ह्यांची तात्काळ चौकशी करावी.
2. दोषींवर कायदेशीर कारवाई करून पत्रकारांना न्याय द्यावा.
3. वार्तांकन करताना पत्रकारांच्या सुरक्षेची हमी द्यावी.
4. पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.
प्रमुख उपस्थिती.
या वेळी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, तालुका अध्यक्ष मुजिब काझी, तालुका कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक, तालुका सचिव तानाजी घोडके, सदस्य फारूक शेख, श्रीराम विद्वत, संतोष शिंदे, रावसाहेब गायकवाड, राहुल बनसोडे आदी पत्रकार उपस्थित होते.
📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.