डॉ शहाजी चंदनशिवे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव उपजिल्हाध्यक्षपदी निवड .

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परांडा दि . १७ ऑगस्ट 2025 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ  शहाजी चंदनशिवे यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ  शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी ताई काळभोर यांच्या संयुक्त सहीने सदर नियुक्तीपत्र देण्यात आले . सदर पदाचा कार्यकाल हा 2028 पर्यंत राहणार आहे . डॉ शहाजी चंदनशिवे यांची  शैक्षणिक सामाजिक संशोधन व साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेमध्ये धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे . अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा उपाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक ( गडंगणकार ) तु दा गंगावणे यांनी डॉ शहाजी चंदनशिवे यांचे अभिनंदन व कौतुक केले . त्यांच्या या निवडीमुळे  गुरुवर्य प्राचार्य डॉ अशोक (दादा ) मोहेकर,  श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर , अध्यक्ष सुनील नाना शिंदे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव , शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथील प्राचार्य डॉ हेमंत भगवान डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर या विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा सिनेट सदस्य डॉ अंकुश कदम ‘याच विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा सिनेट सदस्य डॉ राजेश करपे ,  विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ संजय कांबळे, स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रोफेसर प्राचार्य डॉ शंकर अंभोरे मदत व पुनर्वसन विभाग मंत्रालय मुंबई येथील सचिव सुनील चंदनशिवे कृषी मत्स्य विभाग मंत्रालय येथील अव्वर  सचिव अंबादास चंदनशिवे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य तथा सिनेट सदस्य प्राचार्य डॉ देविदास वायदंडे शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर येथील आरसा शास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ गजानन राशिनकर व समस्त महाराष्ट्रातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील  मित्र परिवार यांनी डॉ शहाजी चंदनशिवे यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!