स्टार माझा न्यूज — परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
मुख्यमंत्री आदेशांची अंमलबजावणी नाही
परांड्यातील सराफ व सुवर्णकार व्यापाऱ्यांवर पोलिस प्रशासनाकडून अमानुष आणि चुकीच्या कारवायांचा आरोप करण्यात आला आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ मार्च २०२४ रोजी दिलेल्या परिपत्रकाची, तसेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याचे व्यापाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
नोटीस न देता पोलिसांचा धडक मोर्चा
व्यापाऱ्यांच्या मते, कोणत्याही गुन्ह्यात योग्य चौकशी न करता फक्त एका आरोपीच्या नावावरून सराफांना संशयित ठरवले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ४१(ए) नोटीस देणे बंधनकारक असतानाही पोलिसांनी सराफा बाजारात गाडी घेऊन धडक कारवाया केल्याचा आरोप आहे.

दक्षता समितीचा अभाव
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनामार्फत दक्षता समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजपर्यंत सराफ सुवर्णकार असोसिएशनला विश्वासात न घेता अशी समिती स्थापन झालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलनाचा इशारा
या अन्यायाविरोधात परांडा सराफ सुवर्णकार असोसिएशनने १० ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत बंद पुकारला आहे. प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास स्वातंत्र्य दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण करण्याच इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर स्वाक्षरी करणारे पदाधिकारी:
राज्य सहसचिव प्रशांत बागडे, तालुका अध्यक्ष सागर लंगोटे, उपाध्यक्ष शिवम पेडगावकर, ओंकार शहाणे, मनोज चिंतामणी, अभिजित पेडगावकर, विनोद चिंतामणी, नितीन महामुनी.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










