७० वर्षांची परंपरा – यंदा ७१ व्या वर्षात बालवीर गणेश मंडळाची भव्य तयारी!

Picture of starmazanews

starmazanews


परंडा प्रतिनिधी – गोरख देशमाने.

परंडा: परंडा शहरातील सर्वांत जुने आणि ऐतिहासिक गणेश मंडळ म्हणून ओळख असलेल्या राजापुरा गल्ली येथील बालवीर गणेश मंडळाचा यंदा ७१ वा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. सन १९५४ साली स्थापन झालेले हे मंडळ स्वतंत्र भारतात स्थापनेनंतरपासून अखंडितपणे दरवर्षी गणेशोत्सवाचे आयोजन करत आहे.

ऐतिहासिक ओळख
पूर्वी परंडा तालुक्यातील गणेशोत्सव काळात आकर्षक देखावे व भक्तांसाठी मनोरंजनाचे साधन म्हणून कोल्हापूर येथील प्रसिद्ध वैभव ऑर्केस्ट्रा सादर करण्याची परंपरा होती. यामुळे बालवीर गणेश मंडळाची तालुक्यात वेगळी ओळख निर्माण झाली होती.

७१ व्या वर्षात पदार्पण
या वर्षी ७१ व्या गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ९ वाजता श्री भवानी शंकर मंदिरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंडळाचे कायम निमंत्रित सल्लागार स्वरूपसिंह (पांडु) ठाकूर यांनी मंडळाला सात फुटी श्री गणेश मूर्ती अर्पण केली. त्यांचा सत्कार करून अभिनंदनाचा ठरावही पारित करण्यात आला.

कार्यकारिणी जाहीर
बैठकीत नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यात –

अध्यक्ष: वेंकटेश दीक्षित

उपाध्यक्ष: सुरजसिंह ठाकूर

खजिनदार: राज वळसंगकर, पावन मिश्रा

सचिव: आदर्शसिंह ठाकूर

सहसचिव: आनंद मोहिते, ऋषिकेश आगरकर


मान्यवरांची उपस्थिती
यावेळी पत्रकार प्रशांत मिश्रा, धीरजसिंह ठाकूर, दीपकसिंह ठाकूर, सारंग ठाकूर, समरजितसिंह ठाकूर, मदन दीक्षित, किशोर महाराज बैरागी, किरण पांडे, अमर ठाकूर, ओम परदेशी, संकेत शुक्ला, शंतनु शहापूरे, रोहन सुरवसे, अनुराग ठाकूर, आयुष सद्धीवाल, राहुल देशमाने, मयुर लोखंडे, सुभाष देशमाने, कपिल महाराज बैरागी, ओंकार तबेलदार, भैय्या मोहिते, हरिहर दीक्षित, अजय पांडे, तुषार पांडे, वरद वळसंगकर, गणेश देशमाने, विश्वजीतसिंह ठाकूर, शुभम जेधे, रक्षितसिंह सद्धीवाल आदींसह अनेक भक्त उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!