काल आयुक्तांचा  निरोप सत्कार…आज ईडीची धडक – वसईत खळबळजनक घडामोडी.

Picture of starmazanews

starmazanews


अनधिकृत बांधकाम प्रकरणात ईडीची कारवाई – माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या अनेक ठिकाणी छापेमारी

ठाणे जिल्हा प्रतिनिधी चंदन सिंह ठाकुर

वसई-विरारमधील अनधिकृत बांधकाम प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाची मोठी धडक; मनपा अधिकाऱ्यांमध्ये खळबळ



छापेमारीची धडाकेबाज सुरुवात

मंगळवार, सकाळी सव्वा सातच्या सुमारास सक्तवसुली संचालनालय (ED) ने वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांशी संबंधित प्रकरणात मोठी कारवाई करत, वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह देशभरात अनेकठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.

एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे.

छापेमारीची ही कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीने आखण्यात आली होती. मुंबई, पुणे, नाशिक, वसई आणि विरार येथील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये बहुसंख्य ठिकाणे अनिलकुमार पवार यांच्याशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असल्याचे सूत्रांकडून समजते.

काल सत्कार, आज छापा – वसईत खळबळ

गेल्या काही दिवसांत माजी आयुक्त पवार यांचा सत्कार समारंभ पार पडला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीने धडक कारवाई केल्यामुळे वसईत तसेच मनपा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काही अधिकाऱ्यांनी या कारवाईनंतर तोंड दडवले आहे.

तपासात सखोल चौकशी

सूत्रांच्या माहितीनुसार, ही कारवाई उशीरापर्यंत सुरू राहणार आहे. अनधिकृत बांधकामातील आर्थिक उलाढाली, लाभार्थी व त्यामागील प्रशासकीय पातळीवर असलेली शिथिलता याचा तपास सुरू आहे. संबंधित कागदपत्रांची झडती घेण्यात येत आहे.

प्रशासनात भीतीचं वातावरण

ईडीच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे मनपा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आगामी काळात आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!