आमची गुणी मुलं प्रतिष्ठानचा गरजू गुणवंतांना आधार ;विद्यार्थ्यांना २५ हजारांची शिष्यवृत्ती प्रदान

Picture of starmazanews

starmazanews

परंडयाची ऐतवाडे ठरली मानकरी

परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा येथील: लिंगायत हटगर कोष्टी समाज संचलित आमची गुणी मुलं प्रतिष्ठान च्या वतीने समाजातील गुणवंत गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या उच्च शिक्षण शिष्यवृत्ती ( २५ हजार रु . व सन्मानपत्र ) ची मानकरी येथील प्रतिक्षा महेश ऐतवाडे ( बी-फार्मसी ) हि ठरली आहे . या विद्यार्थीनीचे पालक महेश ऐतवाडे व मनिषा ऐतवाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.शहरातील कुऱ्हाड गल्ली येथील श्री बनशंकरी देवी मंदिर सभागृहात रविवार ( दि .२७) या निमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला होता .यावेळी सोलापूर उप जिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे ,सेवानिवृत्त प्राचार्य चंद्रकांत घुमरे,प्रगतशील बागायतदार श्रीहरी पाटील ,शिक्षण विस्तार अधिकारी महादेव विटकर ,शिक्षीका मिनाक्षी विटकर ,डॉ.किरण विटकर , परंडा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती .प्रतिष्ठीत व्यापारी हनुमंत विटकर , माजी नगरसेविका वनिता ऐतवाडे , श्रीकृष्ण ऐतवाडे ,कल्याण ऐतवाडे, अरुण ऐतवाडे ,शांतलिंग विटकर, हनुमंत ऐतवाडे ,वैभव पवार ,महेश ऐतवाडे , अंकुश ऐतवाडे , सोमनाथ बोडके, सागर विटकर ,नितीन विटकर ,गणेश ऐतवाडे ,साहिल विटकर ,शुभम ऐतवाडे ,संदीप विटकर, ओंकार ऐतवाडे ,सुहास ऐतवाडे ,सोमनाथ ऐतवाडे ,अमोल ऐतवाडे, शिवाजी पडदुने, बाळासाहेब पडदुने ,गजानन जिरगे, मयूर ऐतवाडे, उमेश ऐतवाडे,संदीप पवार आदि उपस्थित होते . या प्रतिष्ठानकडे उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी कोष्टी समाजातील महाराष्ट्रातील २० विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता . निकषात बसलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिष्ठानच्या निर्णय समितीने ऑनलाईन मुलाखत घेतली व या शिष्यवृत्तीसाठी ४ गरजूवंत विद्यार्थ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली . यामध्ये अर्पिता गणेश जत्ती ( एमबीबीएस , रा .जालना ) कै . गंगाधर कृष्णात नरखेडकर यांच्या स्मरणार्थ ,
सृष्टी दत्तात्रय आंबेकर (बी फार्मसी रा. भाळवणी जि.सोलापूर ) कै .कावेरी संदीपान ऐतवाडे यांच्या स्मरणार्थ ,
प्रतिक्षा महेश ऐतवाडे ( बी फार्मसी, रा . परंडा जि.धाराशिव ) कै. शांताई आण्णाराव उमराणे यांच्या स्मरणार्थ व
सिध्दार्थ गणेश कोंगे ( बी टेक ,रा.वीटा जि . सांगली ) कै . गंगाधर माधवराव येळाई यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी २५ हजार रुपये व सन्मान पत्र देण्यात आले . आमची गुणी मुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ .अशोक सिनगारे ( जालना ) यांनी ऑनलाईनद्वारे उपस्थिनां मार्गदर्शन केले व मदतीचे आवाहन केले . सोलापूर उप जिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी ५ हजार रुपये अर्थसाह्य केले तर शिक्षण विस्तार अधिकारी महादेव विटकर यांनी हि ५ हजार रुपये देण्याचे जाहिर केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षी विटकर यांनी तर आभारप्रदर्शन हनुमंत विटकर यांनी केले .यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते .

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!