स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परांडा प्रतिनिधी दिनांक 26 सेवामंडळ कडून एस. एस. सी.परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राध्यापक लक्ष्मण सांगळे यांचे व्याख्यान
परंडा प्रतिनिधी परंडा येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे एस एस सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या एकूण सात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्राध्यापक लक्ष्मण सांगळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले
यावेळी श्री सूर्यभान हाके गट शिक्षणाधिकारी यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती.
प्रास्ताविक सेवा मंडळाचे सचिव डॉक्टर आनंद पाटील यांनी केले प्रास्ताविक पर भाषणातून त्यांनी मंडळाचे कार्य व विद्यार्थी सत्कार यामागील उद्देश सांगितला व्याख्याते प्राध्यापक लक्ष्मण सांगळे यांनी इंग्रजी गणित व मराठी विषयात असलेले रंजक उदाहरण व काव्य गायन करून आपके विचार मांडले
यावेळी श्री जयंत पाटील यांनी
सेवामंडळ परंडा बद्दल सविस्तर माहिती सांगितली.विधिज्ञ मिलिंद पाटील यांनी आपल्या भाषणात बालपणी च्या प्रशालेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक रामचंद्र इंगळे यांनी परंडा सेवा मंडळ यांच्या सहकार्याने प्रशालेतील समस्या सोडविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करू असे आश्वासन दिले. नंदकिशोर देशमुख अभियंता पुणे यांनी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्राबदल माहिती दिली.गटशिक्षणाधिकारी श्री सूर्यभान हाके यांनी परंडा सेवामंडळ कार्याचे कौतुक केले व सर्व मंडळाचे अभिनंदन केले भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी खालील विद्यार्थी विद्यार्थिनी यांना पारितोषिक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले
जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा
- शेख गौसिया शेखउमर – प्रथम
- बहिरे राफीया इरफान- द्वितीय
3 अरबिना खुद्दूस सय्यद – तृतीय
जिल्हा परिषद प्रशाला परंडा - शिवम कुंदन जाधव प्रथम
- प्रतीक बाळासाहेब बनसोडे. प्रथम
- आलफेज वसीम चाउस
- आकाश हनुमंत बनसोडे
यावेळी रावसाहेब गायकवाड,मधुकर लोखंडे, सुरेशसिंह सददीवाल उमेश पालके कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक दिनकर पवार पत्रकार प्रकाश काशिद गोरख देशमाने विशाल काशिद सतीश खरात नामदेव पखाले, तानाजी मिसाळ, नारायण शिंदे, शशिकांत माने,शुभांगी देशमुख, बाबुधी घाडगे, गीतांजली मंडलिक, रेखा उसराटे, माजी विद्यार्थी पालक व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल काशिद यांनी केले






Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.