➡️ स्थानिक रोजगार, औद्योगिक पुनरुज्जीवनाला मिळणार गती
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी दिनांक 20
🔸आठ महिन्यांच्या कायदेशीर प्रक्रियेला यश
सोलापूर जिल्ह्यातील राजुरी येथील गोविंद पर्व कारखाना अखेर राणा शिपिंग कंपनीकडे अधिकृतपणे हस्तांतरित करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक व प्रशासकीय अडचणीत सापडलेल्या या कारखान्याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेने ‘NCLT’च्या (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण) मुंबई खंडपीठात याचिका दाखल केली होती. निकाल बँकेच्या बाजूने लागल्यानंतर रिझोल्यूशन प्रोफेशनलच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.
🔸 पाच कोटी रुपयांची वसुली, संचालकांची मालमत्ता लक्षात
हा कारखाना सेवानिवृत्त शिक्षक आणि आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक लालासाहेब जगताप यांनी सुरू केला होता. मात्र चुकीचे व्यवस्थापन, तांत्रिक अडचणी व आर्थिक अपयशामुळे तो बंद पडला. परिणामी जिल्हा बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकीत राहिले होते. विक्री प्रक्रियेतून बँकेला सुमारे पावणे पाच कोटी रुपयांची वसुली झाली असून उर्वरित रक्कम संचालक मंडळाच्या वैयक्तिक मालमत्तेतून वसूल केली जाणार आहे.
🔸 श्री. राणा सूर्यवंशी यांचा संघर्ष आणि यश
राणा शिपिंग कंपनीचे प्रतिनिधी श्री. राणा सूर्यवंशी हे पूर्वीपासून या उद्योगाशी संबंधित होते. सुरुवातीस त्यांना दूर ठेवण्याचे प्रयत्न झाले, तरीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत शेवटी हा कारखाना खरेदी करून ताबा घेतला. त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पुढे तेच या कारखान्याचे संचालन करणार आहेत.
🔸 स्थानिक उद्योग उभारणीचे उदाहरण
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक व राजकीय अडथळे होते, तरीही राणा शिपिंग कंपनीने धैर्याने सामना करत हा कारखाना विकत घेतला. हे स्थानिक पातळीवर औद्योगिक पुनरुज्जीवनाचे मोठे उदाहरण मानले जात आहे.
🔸 रोजगार निर्मितीसाठी नव्या आशा
राणा शिपिंग कंपनीने कारखाना पुन्हा कार्यरत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर ४००–५०० रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. तसेच उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या अवशिष्टांचा पुनर्वापर करून ‘प्लाय लाकूड विभाग’ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पूरक उद्योग व स्थानिक रोजगाराच्या संधी वाढतील.
🔸 जिल्ह्यात सकारात्मक वातावरण
नवीन गुंतवणूक, रोजगार संधी, व शेतकऱ्यांना मिळणारा फायदा यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक अर्थचक्राला चालना देत ग्रामीण औद्योगिक विकासाला नवे बळ मिळण्याची शक्यता आहे.
📞 बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898



Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.