स्टार माझा न्यूज परांडा.प्रतिनिधी गोरख देशमाने. (परांडा दिनांक 19 जुलै 2025) ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्रा.किसन चव्हाण यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडी धाराशिव जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये परंडा येथील वंचित बहुजन आघाडी चे धनंजय सोनटक्के यांची जिल्हा महासचिव तर मोहन बनसोडे यांची जिल्हाउपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा च्या वतीने शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य सचिव नसीर शाहबर्फीवाले शहराध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे फुले आंबेडकर विद्वत महासभा राज्य समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चंदनशिवे वंचित बहुजन आघाडी चे ज्येष्ठ नेते उत्तरेश्वर बापू ठवरे शिवाजी घाडगे मा. सरपंच वंचित बहुजन आघाडी परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे रणधीर मिसाळ तानाजी काशीद उपस्थित होते.


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.