स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
🔹 फेर आरक्षणामुळे अनेकांच्या आशेवर विरजण | काहींना दिलासा, काहींना धक्का.
🔹 अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व सर्वसामान्यांसाठी आरक्षण निश्चित.
परंडा प्रतिनिधी | दिनांक – १० जुलै २०२५
परंडा तालुक्यातील २०२५ ते २०३० या कालावधीसाठीच्या ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी तहसील कार्यालय परंडा येथे आरक्षण सोडत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील एकूण ७२ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून यामध्ये ३६ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
🔹 बैठकीत प्रशासनाची उपस्थिती
आरक्षण सोडतीसाठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीस प्रभारी उपविभागीय अधिकारी जयवंत पाटील, तहसीलदार निलेश काकडे, निवडणूक व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आली.
🔹 फेर आरक्षणामुळे अनेकांच्या आशेवर विरजण
गेल्या काही महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली असतानाच फेर आरक्षणामुळे अनेकांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरले आहे. काही प्रस्थापित सरपंच व इच्छुक उमेदवारांच्या ग्रामपंचायती आरक्षणात गेल्याने ते निवडणूक लढवू शकणार नाहीत. परिणामी, तालुक्यात राजकीय अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
🔹 आरक्षणाचे गावनिहाय तपशील
अनुसूचित जाती (SC – ४)
देऊळगाव, भांडगाव, लोणी, वागेगव्हाण
अनुसूचित जाती महिला (SC महिला – ५)
कात्राबाद, कुंभेजा, जाकेपिंपरी, गोसावीवाडी (डोंजा), कार्ला
अनुसूचित जमाती महिला (ST महिला – १)
टाकळी
इतर मागास प्रवर्ग (OBC – १०)
रोहकल, उंडेगाव, कंडारी, पिंपरखेड, काटेवाडी, येणेगाव, बावची, आनाळा, इनगोंदा, शिराळा
इतर मागास प्रवर्ग महिला (OBC महिला – ९)
आलेश्वर, खासापुरी, मलकापूर, वडनेर, धोत्री, कपिलापुरी, पिंपळवाडी, चिंचपूर खुर्द, कुंभेफळ
सर्वसाधारण (OPEN – २२)
देवगाव बुद्रुक, आसू, लोहारा, खासगाव, रत्नापूर, कौडगाव, दहिटणा, घारगाव, जेकटेवाडी, जवळा नि., अरणगाव, आवारपिंपरी, वाकडी, खंडेश्वरवाडी, रुई, ढगपिंपरी, कोकरवाडी, नालगाव, भोत्रा, चिंचपूर बुद्रुक, शेळगाव, मुगाव
सर्वसाधारण महिला (OPEN महिला – २१)
हिंगणगाव बुद्रुक, कांदलगाव, कुक्कडगाव, पाचपिंपळा, साकत खुर्द, देवगाव खुर्द, वाटेफळ, रोसा, राजुरी, डोमगाव, साकत बुद्रुक, डोंजा, तांदुळवाडी, भोजा, सोनारी, सिरसाव, हिंगणगाव खुर्द, पांढरेवाडी, पारेवाडी, अंदोरा, खानापूर
🔹 महिला सक्षमीकरणाला चालना
यंदाच्या आरक्षणात ३६ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव झाल्यामुळे महिला नेतृत्वाला मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणाला गती मिळेल.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898
Star Maza News – बार्शी, सोलापूर

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.