“गाडीच्या फोकसवरून वाद – सिरसावच्या शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या वाकडीच्या 5 जणांविरोधात तक्रार दाखल”

Picture of starmazanews

starmazanews

परंडा प्रतिनिधी | दिनांक: 28 जून 2025

परंडा तालुक्यातील सिरसाव फाट्याजवळ एका शेतकऱ्याला गाडीच्या फोकसबाबत विचारणा केल्यावर बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वाकडी येथील पाच जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी समाधान धनाजी चोबे (वय 35, रा. सिरसाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 24 जून रोजी रात्री 10:00 वाजता ते आपल्या मित्राच्या शेताकडे जात असताना त्यांची मोटरसायकल (MH25 AR6281) सिरसाव फाट्याजवळ आली असता समोरून येणाऱ्या मारुती एर्टिगा (MH12 NU1857) गाडीच्या प्रखर LED लाईटमुळे त्यांना अंधारी आली. त्यांनी त्या गाडीचालकाला  विचारणा केली की, “गाडीचा फोकस एवढा जास्त का असतो?” आम्ही गाड्या कश्या चालवायच्या तुम्ही गाड्या रोड च्या मधून चालवता यावरून गाडीतील व्यक्तीने खाली उतरून त्यांना कानशिलात मारली व शिवीगाळ करत धमकी दिली.

यानंतर समाधान चोबे हे पुढे जात असताना भूम रस्त्यावर केवढकर यांच्या शेताजवळ दोन मोटारसायकलवरून आलेल्या पाच अनोळखी इसमांनी त्यांना अडवले व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली.येथून पुढे माझ्या नादाला लागायचे नाही मी कोण आहे आता समजले का असे म्हणत मारहाण केली. त्यातील एकाने लाकडी काठीने त्यांच्या डाव्या गुडग्यावर व पाठीवर मारून गंभीर जखमी केले. या मारहाणीत ते बेशुद्ध झाले.

घटनेनंतर गावकरी हणुमंत चोबे व अजित चोबे यांनी त्यांना जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले.

1. सुरज महादेव डोके

उपचारादरम्यान भेटीला आलेल्या अभिषेक चोबे यांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तींची ओळख करून दिली. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:

2. ज्ञानेश्वर महादेव डोके

3. प्रतिक बाळासाहेब पाटील

4. प्रणव आण्णासाहेब नलवडे

5. रोहण दादा डोके
(सर्व रा. वाकडी, ता. परंडा, जि. धाराशिव)

या सर्वांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या संबंधित कलमान्वये परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

#StarMazaNews #परंडा #धाराशिव #शेतकरीमारहाण #CrimeNews #PoliceComplaint #ViralNews

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक – रियाज पठाण
 9405749898 / 9408749898
Star Maza News | विश्वासार्हतेचं माध्यम

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!