गुरुकुंज मोझरी येथील बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनास परंड्यातून दिव्यांग उद्योग समूहाचा जाहीर पाठिंबा

Picture of starmazanews

starmazanews


प्रहार शेतकरी संघटना व दिव्यांग उद्योग समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आंदोलनास सक्रीय पाठिंबा.

✍️ प्रतिनिधी – गोरख देशमाने, परंडा
गुरुकुंज मोझरी (ता. मोझरी, जि. अमरावती) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमीत माननीय ओंकार ऊर्फ बच्चू कडू यांनी सुरु केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला परंडा तालुक्यातील दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य व प्रहार शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.

🔹 आंदोलन मागण्या – सर्वसामान्यांसाठी संघर्ष
या अन्नत्याग आंदोलनाद्वारे बच्चू कडू यांनी दिव्यांग, विधवा, शेतकरी, युवक, कामगार, मेंढपाळ व मच्छीमार बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पुढीलप्रमाणे:

1. दिव्यांग व विधवा महिलांना दरमहा ₹६००० मानधन


2. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व एम.एस.पी. वर २०% अनुदान


3. दि. ७ एप्रिल २०२५ च्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी


4. युवकांना रोजगार किंवा सन्मानजनक दाम व रिक्त पदांची भरती


5. ग्रामीण घरकुलासाठी किमान ₹५ लाख अनुदान


6. शेतमजुरांच्या अपघाती मृत्यूसाठी आर्थिक सहाय्य व स्वतंत्र महामंडळ


7. कृषी कामे MREGS मध्ये समाविष्ट करणे व शेतीपूरक व्यवसायांना मदत


8. सेंद्रिय खताला रासायनिक खतासारखे अनुदान


9. मेंढपाळ व मच्छीमार धोरण निर्माण


10. मनरेगामधील मजुरी ₹५०० करण्याची मागणी


11. निवासी अतिक्रमण नियमन


12. गाई व म्हशीच्या दुधासाठी किमान दर ₹५० व ₹६०


13. कांद्याच्या निर्यातीवर बंदी न लावणे – ₹४० दर होईपर्यंत


14. ऊसाला ₹४३०० प्रति टन दर, रिकव्हरीनुसार दर निश्चिती व १५ दिवसांत पैसे





🔹 दिव्यांग बांधवांचा सक्रिय पाठिंबा
या आंदोलनाला पाठिंबा देताना दिव्यांग उद्योग समूहाने म्हटले की, “ही केवळ आंदोलन नव्हे, तर दुर्लक्षित घटकांसाठीचा हक्काचा लढा आहे. बच्चू कडू यांच्या या संघर्षाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.”

🔹 राष्ट्रसंतांच्या भूमीतून उभा राहतोय लोकांचा आवाज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमीत सुरु झालेल्या या आंदोलनाचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहचत असून, परंड्यातून आलेला हा पाठिंबा लढ्याला बळकटी देतो.



बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!