सर्वधर्मीय भाविकांची सोय लक्षात घेता बस सेवा त्वरित सुरू करावी – बार्शी आगाराकडे निवेदन.
बार्शी (प्रतिनिधी) : बार्शी आगारातून पूर्वी सुरू असलेली हैद्रा ते आवाटी बस सेवा काही काळापासून बंद करण्यात आली आहे. ही बससेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मुस्लीम बिरादर जमात संस्था बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बार्शी आगार व्यवस्थापक मा. जाधवर मॅडम यांना निवेदन सादर केले.
उत्पन्न असूनही बस बंद?
या मार्गावरील बससेवा बंद करण्यामागे अधिकृत कारण स्पष्ट नाही. मात्र, प्रवाशांची सतत व नियमित वर्दळ असूनही सेवा थांबवण्यात आली आहे. या सेवेमुळे एस.टी. विभागाला चांगले उत्पन्न मिळत होते, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
धार्मिक व भाविकांसाठी महत्त्वाचा मार्ग
आवाटी येथे विविध सुफी संतांचे धार्मिक स्थळ आहे. तसेच अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे. बार्शी, परांडा, सोलापूर, अक्कलकोट परिसरातील हिंदू व मुस्लीम भाविक मोठ्या संख्येने या मार्गावर प्रवास करतात. हैद्रा–आवाटी बस सेवा बंद झाल्याने भाविकांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे.

विनंती निवेदन सादर
सर्वधर्मीय भाविकांच्या सुविधेसाठी ही सेवा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी करत मुस्लीम बिरादर जमात संस्था बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने अधिकृत निवेदन आगार व्यवस्थापक जाधवर मॅडम यांच्याकडे देण्यात आले आहे.
एस.टी. प्रशासनाकडे अपेक्षा
या मागणीचा गांभीर्याने विचार करून बार्शी–हैद्रा–आवाटी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. भाविक, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी यांच्यासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी मुस्लिम बिरादर जमाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.