शिक्षण विस्ताराधिकारी श्री . दादासाहेब घोगरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

Picture of starmazanews

starmazanews

परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने ता १४ मे   
डोंजा(ता.परंडा)येथील रहिवाशी तथा तांदुळवाडी बीटचे शिक्षण विस्ताराधिकारी श्री.दादासाहेब घोगरे यांना मानव जीवनगौरव व मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यांनी १९८८पासुन केलेल्या शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय”उत्कृष्ट अधिकारी”म्हणुन निवड केली आहे.
   पुरस्कार वितरण दयानंद काॅलेज सभागृह,लातुर येथे रविवार १८मे २५रोजी श्री.विठ्ठल-रुक्मिण मंदिर देवस्थान समिती पंढरपुरचे सहकार्याध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर,जगप्रसिध्द भागवताचार्य पंडित रमाकांत व्यास,जगप्रसिध्द गायक डाॅ.अंबरीष महाराज देगलूरकर,मा .ना.सहकारमंञी श्री .बाबासाहेबजी पाटील यांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे.
  या निवडीसाठी प.स परंडा गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे , प.स भूमचे गटशिक्षणाधिकारी श्री.राहूल भट्टी, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी श्री. अर्जुन जाधव , सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी श्री.बाळकृष्ण मुळे, तसेच शिक्षण विस्ताराधिकारी श्री . सूर्यभान हाके, श्री.शिवाजी काळे, गटशिक्षण कार्यालयातील सर्व कर्मचारी , तांदुळवाडी बीटमधील डोंजा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.भागवत घोगरे , तांदुळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री .आनंद गायकवाड, तसेच बीटमधील खाजगी व जिल्हा परिषेदेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू – भगिनी , तंत्रस्नेही  शिक्षक , डोंजा येथील ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी  श्री .दादासाहेब घोगरे यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!