अवकाळी पावसाचा तडाखा; कंडारी परिसरात विजांचा कडकडाट.
परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.दिं 14 कंडारीत मंगळवारी रात्री घडली दुर्दैवी घटना
परंडा तालुक्यातील कंडारी गावात मंगळवार दिनांक १४ मे रोजी रात्री आठच्या सुमारास विजेचा मोठा कडकडाट झाला. या घटनेत कुंडलीक देशमुख यांच्या शेतात बांधलेल्या जर्सी गाईचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अवकाळी पावसामुळे परिसरात हाहाकार
कंडारीसह रोहकल, अनाळा, पिस्तमवाडी, कुंभेफळ, पाचपिंपळा या परिसरात मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला होता.
गाईवर वीज पडल्यामुळे जागीच मृत्यू
शेतकरी कुंडलीक देशमुख यांच्या शेतात असलेल्या जर्सी गाईवर अचानक वीज पडली. या आघातामुळे गाईचा जागीच मृत्यू झाला. देशमुख कुटुंबीयांवर या दुर्दैवी घटनेमुळे आर्थिक व मानसिक संकट ओढावले आहे.
प्रशासनाकडून घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे डॉ. ऋषिकेश जगदाळे व तलाठी आकाश वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून गाईच्या मृत्यूची नोंद घेतली.
शासकीय मदतीची मागणी
या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कुंडलीक देशमुख यांनी शासनाकडे आर्थिक मदतीसाठी मागणी केली आहे. या घटनेची योग्य दखल घेऊन मदत लवकर मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.