परंडा तालुक्यात धक्कादायक प्रकार, “RO प्लांट गायब… पण लाखोंचे बिल हजर!  निधीची लूट उजेडात”

Picture of starmazanews

starmazanews

पाण्याच्या योजनेतच घोटाळा! RO प्लांट न बसवताच बिल उचलले – शासकीय अधिकाऱ्यांनाही फसवले!”



परांडा प्रतिनिधी दिनांक 9 मे 15 व्या वित्त आयोगातून मंजूर, पण प्रत्यक्षात शून्य काम!
सन 2022-23 मध्ये 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून परंडा तालुक्यातील विविध गावांमध्ये RO प्लांट बसवण्याची योजना आखण्यात आली होती. पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून ही कामे होणार होती. मात्र सिरसाव गावात RO प्लांट प्रत्यक्षात बसवण्यात आलेच नाही, तरीही लाखोंचे बिल शासनाकडून उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.



तक्रारदार अनंत जाधव यांचा  आरोप – थेट धाराशिवच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार
गावातील सामाजिक कार्यकर्ते अनंत जाधव यांनी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सविस्तर तक्रारीचा अर्ज दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, “सिरसाव येथे RO प्लांट अस्तित्वात नाही. मात्र लाखोंचे बिल संबंधित ठेकेदाराने शासनाकडून उचलले आहे”, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे


8 मे रोजी अधिकृत पंचनामा – साहित्य अपूर्ण असल्याचा अहवाल
दिनांक 8 मे रोजी शिरसाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक श्री. मदने यांनी प्रत्यक्ष प्लांटची पाहणी करून पंचनामा केला.
या पंचनाम्यात त्यांनी साहित्य हे इस्टिमेट प्रमाणे अपूर्ण असून, RO प्लांट कार्यान्वित स्थितीत नाही, असा लिखित अहवाल सादर केला आहे. त्यामुळे या घोटाळ्याला अधिकृत दुजोरा मिळालेला आहे.


शासन निधीचा अपहार – दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. शासनाच्या पैशाचा असा अपहार होणे म्हणजे जनतेच्या हक्कांची थेट पायमल्ली आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ठेकेदाराची झाकपट्टी – गैरइस्टीमेट साहित्याची चढाओढ
गावात प्रकरण चिघळल्यावर ठेकेदाराने काही साहित्य पाठवले, परंतु ते इस्टिमेटमध्ये नसलेले असल्याचेही नोंदवले गेले आहे.
पूर्वी पाठवलेले साहित्य अपूर्ण, आणि RO यंत्रणा अद्याप न वापरण्यायोग्य स्थितीत आहे.


ग्रामस्थांचा इशारा – RO प्लांट सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, तत्काळ इस्टिमेट प्रमाणे साहित्य बसवून RO प्लांट कार्यान्वित झाला नाही, तर संपूर्ण गाव पातळीवर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
“पाण्यासारख्या संवेदनशील योजनेत असा भ्रष्टाचार हा शासन व्यवस्थेचा अपमान आहे,” असे संतप्त ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

प्रशासन जागे होईल का? – जनतेचा थेट सवाल
मुख्य कार्यकारी अधिकारी धाराशिव (उस्मानाबाद), पाणीपुरवठा विभाग व गटविकास अधिकारी परंडा यांनी याची तात्काळ दखल घेऊन सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा केलीच पाहिजे.
ही चौकशी जर थांबली, तर इतर गावांतूनही अशाच प्रकारचे घोटाळे बाहेर येण्याची शक्यता आहे.



बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!