स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने//डॉ शहाजी चंदनशिवे .
परंडा दि .1 मे 2025 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी सर्वप्रथम राष्ट्रगीत व नंतर महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले . महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतीक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभणे यांनी केले होते . याप्रसंगी कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने यांच्यासह सर्व महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते .
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









