तळागाळातील समाजहितासाठी कार्य करणाऱ्या जुबेर बागवान यांना ‘युगदर्शक आयकॉन पुरस्कार 2025’
बार्शी (प्रतिनिधी) – समाजात उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना दरवर्षी युगदर्शक प्रतिष्ठानतर्फे “युगदर्शक आयकॉन पुरस्कार” प्रदान केला जातो. 2025 सालचा हा मानाचा पुरस्कार बार्शीतील बागवान सोशल फाउंडेशन या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुबेर भाई बागवान यांना त्यांच्या उल्लेखनीय समाजसेवेसाठी गौरविण्यात आले.
हा पुरस्कार वितरण सोहळा 26 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता, यशवंतराव चव्हाण हॉल, मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. दिलीपराव सोपल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवरत्न शेटे, प्रीती बांगर, पप्पा कसबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बागवान सोशल फाउंडेशन गेली अनेक वर्षं समाजाच्या तळागाळातील घटकांसाठी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्याक विकास आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवत आहे. या संस्थेने ग्रामीण व शहरी भागातील हजारो लोकांपर्यंत पोहोचून समाजात जागरुकता निर्माण केली आहे.
कार्यक्रमास युगदर्शक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन भोसले, मा. वि. गटनेचे नागेश अक्कलकोटे, डॉ. प्रकाश बुरगुटे, पत्रकार संतोष सूर्यवंशी, संजय आबा बारबोले, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, नाना वाणी, अण्णा पेठकर, सुरज मुल्ला, गोणेकर व युगदर्शक टीमचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बागवान समाजाचे प्रतिनिधी विविध भागांतून उपस्थित होते. त्यामध्ये मुक्तार बागवान (अकलूज), फरीद भाई बागवान, बिलाल भाई बागवान (मंगळवेढा), नजीर इनामदार (राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष), रईस बागवान (वैराग), शफिक भाई बागवान (करमाळा), रशीद तांबोळी, हाजी सलीम बागवान, रफिक बागवान (पुणे), बाकी भाई बागवान (संभाजीनगर), डॉ. शरीफ बागवान (जळगाव), नासिर भाई बागवान (सातारा), हबीब भाई बागवान (परभणी), रशीद भाई बागवान (बीड) आदींचा समावेश होता.
तसेच कार्यक्रमात सुनंदाताई चव्हाण, प्रमिलाताई झोंबाडे, मनगिरेताई, राजश्री गवळी, इब्राहिम काजी, बादशाह बागवान, पत्रकार आजम बागवान, पत्रकार संगीता पवार, फिल्म अभिनेता दीपक ओहाळ, तसेच जुबेर भाई बागवान यांचे कुटुंबीय आणि बागवान सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले, तर आभारप्रदर्शन नितीन भोसले यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.