सोनारी येथे काळभैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा संपन्न

Picture of starmazanews

starmazanews



परंडा प्रतिनिधी – गोरख देशमाने.
ता. २७ एप्रिल, रविवार रोजी श्री क्षेत्र सोनारी (ता. परंडा) येथे श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कुस्ती स्पर्धेत राज्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावून लाल मातीवर चुरशीची झुंज दिली.

अंतिम फडात विजय मांडवे व अनिल जाधव (करमाळा) यांच्यात ५१ हजार रुपयांच्या इनामाची कुस्ती रंगली. ती अतिशय अटीतटीच्या लढतीनंतर बरोबरीत सोडविण्यात आली. क्रमांक दोनच्या कुस्तीत बाळू भैरवाल (कडआष्टी) याने प्रमोद सुळ (कुर्डुवाडी) यास पोकळ घिस्सा डावावर चितपट करून ३१ हजार रुपयांचे इनाम पटकावले.



या कुस्ती मैदानात १५० लहान-मोठ्या कुस्त्या घेण्यात आल्या. मैदानासाठी सुसज्ज लाल मातीचा आखाडा तयार करण्यात आला होता. मैदानात २०० रुपयांपासून ते ५१ हजार रुपयांपर्यंत रोख इनामे देण्यात आली.

यात्रेनिमित्त सायंकाळी ४ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा रंगली. या स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते सुरुवात झाली. ढाक, साल्तु (बॅक थ्रो), झोळी, घिस्सा, छडी टांग यांसारख्या डावांनी मल्लांनी मैदानात रंगत आणली.



मल्ल मनोज पवार याने धीरज बारसकर यास ढाक डावावर चितपट केले. मेघराज जगताप विरुद्ध रविंद्र खैरे यांची कुस्ती तुल्यबळ लढतीनंतर बरोबरीत सोडविण्यात आली.

या मैदानात मल्ल गौरव गुटाळ, गणेश काळे, अजय चोरगे, ऋषी मेंडके, संतोष नरुटे, किरण पाडुळे, समीर पठाण, किरण काळदाते, शिवराज लोकरे, पवन करकुटे, मेघराज देवकर, हर्षद लोमटे, करण फले, गणेश कारंडे, रोहित काळे, अंकुर नलवडे, शहाजी फले यांनी प्रेक्षणीय विजय मिळविला.

पंच म्हणून महेंद्र ठवरे, सतीश मिस्कीन, दादा फराटे, मनोज बकाल, शहाजी बारसकर, श्रीराम गोडगे, राहुल भांडवलकर, बालाजी मिस्कीन यांनी काम पाहिले. कुस्ती स्पर्धेचे उत्कृष्ट समालोचन दिनेश गवळी (बार्शी) व युवराज सोलंनकर (राशिन) यांनी केले.



या भव्य कुस्ती आखाड्यासाठी याञा कमिटी अध्यक्ष नवनाथ जगताप, सरपंच मेजर परमेश्वर मांडवे, ईश्वर मोरे, अंगद फरताडे, जयराम नलवडे, राम पाटील, अमर गाडे, विजय धुमाळ व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – ९४०५७४९८९८ / ९४०८७४९८९८

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!