बार्शीचा अभिमान!
बार्शी : बार्शी शहराचा मान उंचावणारी आनंददायक बातमी! येथील सुपुत्र डॉ. सारंग शरद खडके यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत, २०२४-२५ मध्ये झालेल्या NEET SS परीक्षेत देशपातळीवर १७९३ वी मेरिट रँक मिळवून आपल्या नावाची उजळणी केली आहे. त्यांच्या या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. सारंग यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे. त्यांनी NEET UG परीक्षेत महाराष्ट्रात १३८ वा राज्य क्रमांक पटकावत वैद्यकीय शिक्षणाच्या वाटचालीला सुरुवात केली. प्रतिष्ठित सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज केईएम हॉस्पिटल, मुंबई येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. यानंतर, NEET PG परीक्षेत देशभरातून AIR 6258 मिळवत त्यांनी वॉकहार्ड हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथून DNB, Medicine ही पदव्युत्तर पदवी संपादन केली. डॉ. सारंग यांचा आता गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी या अत्यंत महत्त्वाच्या सुपर स्पेशालिटीमध्ये अधिक संशोधन व सेवा देण्याचा मनोदय आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे बार्शीच्या नावाला नवे उंची गाठण्याची संधी मिळाली आहे.

बार्शीकरांच्या वतीने डॉ. सारंग यांना पुढील शिक्षण, संशोधन आणि यशस्वी वैद्यकीय कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक आशीर्वाद देण्यात येत आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.