परंडा (प्रतिनिधी) :गोरख देशमाने
परंडा तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी येथे श्री. काळ भैरवनाथ यात्रेनिमित्त आलेल्या भाविक भक्तांसाठी स्व. पांडुरंग मामा कोळगे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या पाणपोईचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते सोनारी चौक येथे पार पडला.
प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी कोळगे परिवाराच्या वतीने यात्रेस येणाऱ्या भाविकांना थंड पाणी व गुळाचा खडा वाटप करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या मराठवाडा सरचिटणीस सौ. आशाताई मोरजकर, महाराष्ट्र चॅम्पियन संजय आप्पा काशीद, माजी नगरसेवक गणेश राशनकर, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गोरख मोरजकर, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष समाधान खुळे, मुद्रांक विक्रेते जाकीर पटेल, राजकुमार देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच तहसीलदार निलेश काकडे, पोलीस निरीक्षक ओंकार पारेकर, बीट अंमलदार नितीन गुंडाळे, मंडळ अधिकारी पवार, माजी नगरसेवक इरफान शेख, हाफीज करपुडे, हाफीज सक्लेन सौदागर, पत्रकार किरण डाके यांनीही पाणपोईला भेट देऊन कोळगे परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले.
या पाणपोईच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण कोळगे, मनोज कोळगे, संजय कोळगे, राजु कोळगे, अजित कोळगे, ओंकार कोळगे, अभिजीत कोळगे, ओम कोळगे, तुकाराम पाटील, डॉ. मोहन नाळे, नवाबोड्डीन मुजावर, ॲड. नागनाथ सुर्यवंशी, ॲड. अप्पासाहेब दैन, संदीप टनटक, विरेंद्र काशीद, गणेश गायकवाड, तनवीर शेख, अतुल सोनवणे, प्रेम चव्हाण, गणेश चव्हाण (पुणे) यांनी परिश्रम घेतले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898