परंडा (प्रतिनिधी : गोरख देशमाने.) – परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक नाडी समजल्या जाणाऱ्या आणि तालुक्यातील सर्वात मोठ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये शब्बीर खान पठाण यांची तज्ञ संचालकपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड माजी आमदार कै. ज्ञानेश्वर पाटील यांचे खंदे समर्थक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रंजीतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
शब्बीर खान पठाण हे परंडा शहराचे माजी नगरसेवक असून त्यांचा समाजकार्याचा प्रदीर्घ अनुभव आणि सहकारी क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीच्या निमित्ताने त्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सामाजिक न्याय विभागाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष राहुलजी बनसोडे, परंडा माजी नगराध्यक्ष रमेशसिंह परदेशी, ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. नवनाथ वाघमोडे, पिंपरखेडचे माजी सरपंच नागनाथ थोरात, नगरपरिषद परंडा निवृत्त कर्मचारी महेश कसबे, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष गणीभाई हावरे, दिव्यांग जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे, जाऊद्दीन वस्ताद मुजावर, युवक शहराध्यक्ष खय्युम तुटके, पत्रकार वाजिद पठाण, गोरख देशमाने आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार समारंभात शब्बीर खान पठाण यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास कायम ठेवून, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य सदस्यांच्या हितासाठी काम करण्याचे आश्वासन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.