परंडा भुईकोट किल्ल्याला वारसा दिनानिमित्त विशेष महत्त्व!
(जागतिक वारसा दिन – १८ एप्रिल)
परंडा (ता.१७): प्रतिनिधी – गोरख देशमाने
१८ एप्रिल हा दिवस जगभरात ‘जागतिक वारसा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्या परंडा तालुक्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याकडे नव्याने लक्ष वेधले जात आहे.
हा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय वारसा स्थळे व परिषदेकडून मांडण्यात आला होता आणि १९८३ पासून जगभरात हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. यंदाची थीम आहे – “आपत्ती आणि संघर्ष प्रतिरोधक वारसा”.
भारत हा देश वारसा स्थळांनी समृद्ध आहे. युनेस्कोच्या यादीत भारताचे ४३ स्थळांचा समावेश आहे, ज्यात महाराष्ट्रातील ६ ठिकाणे – अजंठा, वेरूळ, घारपुरी, मुंबईतील सीएसटी स्टेशन, कास पठार यांचा समावेश आहे.
परंडा किल्ला देखील ऐतिहासिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून, भविष्यात युनेस्कोच्या यादीत नाव समाविष्ट होण्याची शक्यता आहे, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होते आहे.
दरवर्षी युनेस्को जागतिक वारसा समितीचं संमेलन घेते. यामध्ये नवीन स्थळांची यादी ठरवली जाते. यंदा भारताने पाठवलेले नामांकन आहे – ‘मराठा मिलिटरी लँडस्केप’. यात छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले – रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी व तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.
या उपक्रमांमुळे स्थानिक वारसा स्थळांना जगाच्या नकाशावर स्थान मिळेल, अशी आशा आहे.
– अजय माळी, सहयोगी सदस्य, आंतरराष्ट्रीय वारसा स्थळे व परिषद
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.