शंभु महादेव यात्रेनिमित्त शिराळा येथे रंगला कुस्त्यांचा फड!

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा ता. ११ (प्रतिनिधी) ग्रामदैवत शंभु महादेव याञेनिमित्त आयोजित कुस्ती आखाड्यात अंतीम एक लाख इनामाच्या कुस्तीत महाराष्ट्र चँपीयन मनिष रायते (अंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे)  याने महाराष्ट्र चँपीयन सतपाल सोनटक्के (अकलुज)  यास तुल्यबळ लढतीनंतर लपेट डावावर चितपट करीत रोख इनामाचे बक्षिस पटकाविले. तर क्रमांक दोनच्या कुस्तीत रविंद्र खैरे याने  विश्वचरण सोलंकर  यास प्रेक्षणीय डंकी डावावर आस्मान दाखवित चितपट केले.   रोख ७५  हजाराचे बक्षिस पटकावले.
    तालुक्यातील शिराळा येथील ग्रामदैवत शंभु महादेव याञात्सव बुधवार ता.९ रोजी पार पडला.या याञात्सवात शंभु महादेवाची छबीना मिरवणुक,शोभेची दारुकाम आतिषबाजी, कलगीतुरा, किर्तन, शाहिरी पोवाडे आदि  कार्यक्रम घेण्यात आले.गुरुवार ता.१० रोजी याञेनिमित्त भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते.

कुस्ती स्पर्धेसाठी सुसज्ज लाल मातीचा आखाडा  तयार करण्यात आला होता.दुपारी चार वाजता मान्यवरांच्या हस्ते आखाडा पुजन करण्यात आले.या कुस्ती आखाड्यात १०० रुपयापासुन ते एक लाखापर्यंत लहान-मोठ्या कुस्त्या घेण्यात आल्या.सिना नदीकाठी वसलेले शिराळा हे गाव द्राक्ष बागायतीसाठी सर्वदुर प्रसिद्ध आहे. आखाड्यातील अंतीम  मनिष रायते व सतपाल सोनटक्के  यांच्या कुस्तीला राञी-९ वाजुन ३० मिनिटाला सुरुवात झाली.सुमारे पंधरा मिनिटे अटितटीच्या तुल्यबळ घमासान लढतीनंतर रायते याने बाजी मारली.दुरगावाहुन आलेल्या मल्लांनी डाव प्रतिडाव करीत कुस्तीखेळात चितपट व निकाली कुस्तीने मैदानात जोश निर्माण केला.विजयी मल्लांना प्रेक्षकांनी बक्षिसे देऊन प्रोत्साहीत केले.अकरा हलगीच्या कडकडाटाने मैदानात मोठी रंगत आणली होती .या आखाड्यात सोमनाथ मोरे,अतुल लवटे, रोहन माळी,उमेश कदम’किरण चव्हाण’संग्राम घोगरे वैभव जाधव,ओम शिंदे, करण चव्हाण,मनोज मिसाळ, रणवीर आप्पा कसबे,आदेश ढोरे, मल्लांनी प्रतिस्पर्धी मल्लांना चितपट करीत विजय मिळविले.या आखाड्यात आजी-माजी वस्ताद, जेष्ठ मल्लांचा, खेळाडुंचा सन्मान गौरव   करण्यात आला.या कुस्ती आखाड्यासाठी कुस्तीप्रेमी, प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.कुस्ती आखाड्याचे खुमासदार समालोचन दिनेश गवळी (बार्शी ) व शाहीर शरद नवले यांनी केले.याञेसाठी व कुस्ती मैदानासाठी भारत ढोरे,सदानंद बोंबलट, ज्ञानेश्वर  नवले,जनार्दन वाघमोडे,बप्पा बोरकर,मेजर नितीन नवले,युवराज ढोरे,संजय चाबुकस्वार,शुक्राचार्य ढोरे’रेवण ढोरे, प्रकाश पाटील,दिगंबर सलकर  आदिसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!