परंडा प्रतिनिधी – गोरख देशमाने
परंडा येथे विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने परंडा शहरातील दहा शाळांतील हुशार व गरजू अशा 100 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदगर यांच्या हस्ते पार पडला. अरबी ग्रुप, नालंदा उद्योग समूह आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बौद्धाचार्य महावीर बनसोडे यांच्या वतीने त्रिसरण पंचशील घेऊन वंदना करण्यात आली.
कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांनी केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये शिवसेना युवा नेते विश्वजित पाटील, माजी प्राचार्य चंद्रकांत घुमरे, सौ. आशा मोरजकर, काकासाहेब साळुंके, जयकुमार जैन, जावेद बागवान, मतीन जीनेरी, श्याम मोरे, संजय काशीद, रईस मुजावर, दीपक थोरबोले, हारून पठाण, गणेश राशनकर, देवानंद टकले, मनोज कोळगे, इरफान शेख, दीपक गायकवाड, डॉ. शहाजी चंदनशिवे, तु.दा. गंगावणे, प्रा. गोविंद जाधव, धनंजय सोनटक्के, मोहन बनसोडे, प्रा. गोरख मोरजकर, बाबुराव काळे, समीर पठाण, डॉ. नवनाथ वाघमोडे, गणी हावरे, खय्यूम तुटके, दयानंद बनसोडे, अजीनाथ राऊत, सत्तार पठाण, नवजीवन चौधरी, नागनाथ थोरात, गायिका गणीता गव्हाळे, राजाभाऊ चव्हाण यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान खुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राहुल बनसोडे, बिभीषण खुणे, घनश्याम शिंदे, किशोर वाघमारे, अँड. ऋषिकेश बनसोडे, अँड. रणजित नागटिळक, इंजि. प्रतिक बनसोडे, सिध्दार्थ बनसोडे, हर्षवर्धन पाटील, ओंकार नलवडे, शिवतेज नलवडे, जीवन बनसोडे, रुपेश बनसोडे, कृष्णा चौधरी, महेंद्र बनसोडे, गणेश मदने, अभिजीत नलवडे, बाळासाहेब माकानिकर, ओंकार कुंभारे, कृष्णा नरूटे, अकिब तांबोळी, ओंकार मेहेर, अविनाश बनसोडे, दत्ता बनसोडे, यश शिंदे, प्रतापसिंह बसवंत यांनी विशेष मेहनत घेतली.
संपादक: रियाज पठाण
संपर्क: 9405749898 / 9408749898
स्टार माझा न्यूज, परंडा

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.