स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा दि ११ ( प्रतिनिधी ) अंशकालीन कर्मचारी म्हणून सेवा केलेले व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार प्रकाश काशीद यांची नुकतीच मुंबई महापालिकेच्या सहाय्यक कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे . काशीद यांचा शुक्रवार दि ११ रोजी शासकीय विश्रामगृहात व्हॉईस ऑफ मीडिया शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला .
पत्रकार काशीद हे गेल्या अनेक वर्षापासून नोकरीच्या शोधात होते सरकारी नोकरी आपल्याला असावी अशी जिद्द चिकाटी होती . त्यांनी विविध परिक्षा दिल्या आहेत . नौकरी त्यांना हुलकावणी देत आली . त्यातून ते गेले पंधरा वर्षापासून पत्रकार म्हणून एका मोठ्या दैनिकात काम पाहत आहेत . याच्या माध्यमातून परंडा तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक घडामोडी जनतेसमोर मांडत आहेत .
परंडा शहराला लाभलेल्या ऐतिहासिक किल्ला जिवंत असल्याचे उदाहरणे , सामाजिक उपक्रम घेऊन ते किल्ल्याविषयी पर्यटकांना माहिती देत होते. काशीद यांनी एम.ए पूर्ण केले व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे बॅचलर ऑफ जर्नालिझम पूर्ण करतांना विद्यापीठात कमवा आणि शिका या धर्तीवर त्यांनी विद्यापीठाच्या मेस मध्ये काम केले आहे . नोकरी न मिळाल्याने त्यांनी परंड्यात सलूनचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवीत आहेत. यातूनच त्यांना जीवनामध्ये नवी उमेद मिळाली ती म्हणजे अंशकालीन पदवीधर असल्याची यामध्ये त्यांना वयोमर्यादा वाढवण्यात आली त्यानुसार त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली अशात त्यांनी तलाठी व बृहन्मुंबई महानगरपालिका अशा दोन पदाच्या परीक्षा दिल्या यामध्ये तलाठी या पदासाठी सोलापूर जिल्ह्यात वेटिंग लिस्ट मध्ये आहेत .

अशातच ८ एप्रिल २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेची यादी लागली या यादीमध्ये प्रकाश दगडु काशीद यांची निवड झाली आहे .बोलताना काशीद म्हणाले की या निवडीमुळे सर्व मित्र परिवार व नातेवाईकाच्या वतीने व तालुक्यातून थोर मोठ्यांचा अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे तालुकाध्यक्ष मुजीब काझी उपाध्यक्ष दत्ता नरूटे सचिव तानाजी घोडके मार्गदर्शक श्रीराम विद्वत , साजीद शेख ,अजित शिंदे गोरख देशमाने , फारुक शेख विजय मेहर ,समीर ओव्हाळ, गणेश वाघमोडे ,रामा गोडगे अदि उपस्थित होते .

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.