प्रतिनिधी – महताब शेख, तुळजापूर.
आज तुळजापूर तहसील कार्यालयासमोर वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात “कुल जमाते तंजीम तुळजापूर” च्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुस्लिम समाजातील जेष्ठ, युवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपला पाठिंबा दर्शविला.
वक्फ सुधारणा विधेयक तात्काळ मागे घेण्यात यावे, ही मागणी आंदोलनकर्त्यांनी एकमुखाने केली. यानंतर आंदोलनाचे निवेदन तहसीलदारांच्या माध्यमातून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात आले.

या आंदोलनात जिल्हा पातळीवरील अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते. यामध्ये
मसूद शेख, मुफ्ती फिरदोस, मौलाना गुलाम रजवी, हाफीज इब्राहिम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. धीरज भैय्या पाटील, मा. नगरसेवक अमर भैय्या मगर, नगराध्यक्ष एम.के पठाण, तौफिक शेख, शेकापचे नेते उत्तम नाना अमृतराव, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे नेते श्यामभाऊ पवार, रुबाब भाई पठाण, शरद जगदाळे, आरपीआयचे संजय नाना शितोळे, धैर्यशील कापसे, बाबासाहेब मस्के, एड. कुलकर्णी साहेब, युसूफ भाई शेख, हाजी जावेदसाब बागवान, अफसर शेख, अरीफ भाई बागवान, मतीन बागवान, रईस सिद्दीकी, इब्राहिम इनामदार, सिद्दीक पटेल, मकसूद शेख, रफीक शेख, जमीर शेख, अशपाक सय्यद, अहमद अन्सारी, रहीम शेख, कलीम शेख, असलम तांबोळी, इमरान बागवान, आयाज पठाण, इलियास अत्तार, अझहर आत्तार, अजिज सय्यद, एड. फारुक शेख* यांचा समावेश होता.
तसेच मुस्लिम समाजातील प्रमुख धर्मगुरूंनी व जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या नेतृत्वाने या आंदोलनास आपले संपूर्ण समर्थन दिले. शेकडोच्या संख्येने समाज बांधवांनी आंदोलनात सहभाग नोंदवत एकजूट दाखवली.
शेवटी सर्वांनी एकमुखाने वक्फ सुधारणा विधेयक मागे घेण्याची मागणी केली. जर हे विधेयक त्वरित रद्द करण्यात आले नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तौफिक शेख यांनी दिला.
संपादक स्टार माझा न्यूज– रियाज पठाण 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.