महाराष्ट्र केसरी विजेते सतपाल सोनटक्के यांचा परंडा येथे भव्य सत्कार.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा (प्रतिनिधी) – नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 97 किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या पैलवान सतपाल सोनटक्के यांचा परंडा येथे भव्य सत्कार करण्यात आला. त्यांनी महाराष्ट्र केसरी चॅम्पियनचा मान पटकावून शिवनेरी तालीम, अकलूज व दत्ता आप्पा वाघमारे यांच्या पट्ट्याला गौरव मिळवून दिला आहे.

या गौरवप्रसंगी परंडा शहरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी अ‍ॅड. सतीश माने, अ‍ॅड. हरिभाऊ सूर्यवंशी, अ‍ॅड. अजित महाडिक, पोलीस कॉन्स्टेबल संजय म्हेत्रे, अमृततुल्य हॉटेलचे मालक पै. राहुल वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष गणीभाई हावरे, पत्रकार गोरख देशमाने, कृष्णा नरुटे, बळीराम ईतापे आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्कार समारंभात सर्व मान्यवरांच्या हस्ते सतपाल सोनटक्के यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे परंडा परिसरात आनंदाचे वातावरण असून, युवकांमध्ये कुस्तीबद्दल नवचैतन्य निर्माण झाले आहे.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Recent Posts
error: Content is protected !!