प्रतिनिधी – गोरख देशमाने, स्टार माझा न्यूज परंडा.
परंडा (ता. 6एप्रिल) – धाराशिव लघुपाटबंधारे उपविभाग क्रमांक ४ परंडा येथील कालवा निरीक्षक रघुनाथ माळी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानपूर्वक निरोप समारंभ पार पडला. या प्रसंगी महात्मा जोतीबा फुले यांची प्रतिमा देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
रघुनाथ माळी हे वयाच्या ४६ व्या वर्षी लघुपाटबंधारे विभागात सरळ सेवा भरती अंतर्गत सेवेत रुजू झाले होते. आज दिनांक ४ एप्रिल रोजी त्यांची सेवानिवृत्ती झाली. या भावनिक सोहळ्यात विभागातील सहकारी, अधिकारी व नागरिकांनी त्यांना निरोप दिला.
यावेळी शाखा अभियंता गोवर्धन उबाळे, जलसंधारण अधिकारी सागर धुमाळ, व्हाईस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, पत्रकार सुरेश घाडगे, माजी नगरसेवक संजय घाडगे यांच्यासह लघुपाटबंधारे विभागातील कर्मचारी गफार मुलाणी, धनाजी काकडे, बाबुराव तनपुरे, सुनील सोणवणे, सचिन होरे, हेमंत शेटे, माणिक शिंगनाथ, भागवत तिव्हाणे, आमोल जावळे, रामचंद्र गायकवाड, सुहास मचिंद्र, आरती हावळे, अंकिता थोटे, अशोक गटकुळ, बालाजी गायकवाड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात रघुनाथ माळी यांचे कार्य आणि योगदान गौरवण्यात आले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
संपादक – रियाज पठाण, स्टार माझा न्यूज
संपर्क – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.