परंडा(प्रतिनिधी )गोरख देशमाने
परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या निवेदनानुसार परंडा येथे दिनांक ४एप्रिल २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.यामध्ये 30 दिव्यांगाची तपासण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा यांच्या वतीने हा कॅम्प यशस्वी पार पाडण्यात आला
या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग , मतिमंद दिव्यांग, अंध अशा एकूण 30 दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या तपासण्या करण्यासाठी धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर डॉ.ज्योती कल्याणी डॉ आयुश शिंदे डॉ मनोज कवढे यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योगसमूहाचे जिल्हाप्रमुख तानाजी घोडके उत्तम शिंदे, प्रकाश बदर शिक्षण विभागातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कामकाज पाहणारे कर्मचारी हाजगुडे, जाधव मॅडम तसेच सरकारी दवाखाना वैद्यकीय अधिकारी डॉ कुलकर्णी एक्स रे विभाग बापू खताळ , भराटे आदीसह कर्मचारी यांनी सहकार्य केले.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.