स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा, दि. ३१ (प्रतिनिधी)- रमजान ईद सोमवार ३१ मार्च रोजी शहरासह परंडा पोलीस ठाण्याच्या हाद्दीत आकरा ठिकाणी शांततेत उत्साहात साजरी करण्यात आली.
शहरात ईदची नमाज मुस्लिम बांधवांनी मोगल मस्जीद , पल्ला मस्जीद तर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईदगा मैदानावर जफरअली काझी यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा केली. रमजान ईदची नमाज अदा करण्याआधी शहर काझी जफरअली यांनी मुस्लिम बांधवांनी रमजान महिनाभर रोजे (उपवास ) केले याचे महत्त्व काय आहे ते सांगितले . नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेटी देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या पोलीस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर तहसीलदार निलेश काकडे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खरात पोलीस हवालदार पवार , शिंदे , शेख , मुख्याध्यापक अंकुशराव जाधव , नितीन गुंडाळे यांनी मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . परंडा पोलीस ठाण्याच्या हाद्दीत शहरात तीन ठिकाणी तर ग्रामीण भागात जवळा ( नि ) , माणकेश्वर, शेकापूर , लोणी , आसु , वाकडी , कुंभेफळ , बावची सिरसाव या ठिकाणी ईदची नमाज उत्साहात पार पाडली.
स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.








