स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शी (प्रतिनिधी): बार्शी शहरातील शाही नाईकवाडी ईदगाह येथे ईद-उल-फित्रची नमाज मोठ्या उत्साहात अदा करण्यात आली. यावेळी बार्शी शहर व परिसरातील हजारो मुस्लिम बांधव एकत्र येऊन नमाज अदा करण्यासाठी उपस्थित होते.

रमजान ईदचे महत्त्व
रमजान ईद, ज्याला ईद-उल-फित्र असेही म्हणतात, ही इस्लाम धर्मातील सर्वांत पवित्र सणांपैकी एक आहे. हा सण रमजान महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो. रमजान हा संयम, आत्मशुद्धी आणि ईश्वरभक्तीचा महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजे (उपवास) धरतात आणि अल्लाहची भक्ती करतात. रमजान ईद हा सण आनंद, परस्पर प्रेम आणि दानशूरतेचा संदेश देतो. या दिवशी विशेष नमाज अदा केली जाते आणि दानधर्म (सद्कत-उल-फित्र) दिला जातो, जेणेकरून गरजू आणि गरीब लोकांनाही ईदचा आनंद मिळू शकतो.

ईदच्या नमाजाची उत्साहपूर्ण अदा
ईदची मुख्य नमाज बार्शी मदिना मस्जिदचे मौलाना अन्वारुल हक साहब यांच्या मागे अदा करण्यात आली. नमाजानंतर मौलानांनी देशात शांतता, बंधुता आणि सलोखा नांदावा, तसेच सर्व समाज एकमेकांच्या सुखदुःखात आणि अडीअडचणींमध्ये सहभागी व्हावा, अशी प्रार्थना केली.

नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. या प्रसंगी लहान मुले, तरुण तसेच वयोवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लहान मुलांना व वृद्धांना त्रास होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

या नमाज अदा करण्यासाठी बार्शीतील प्रतिष्ठित उद्योगपती, व्यापारी, राजकीय व्यक्ती, तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बार्शी शहराचे माजी नगराध्यक्ष असिफ भाई तांबोळी, बार्शीचे प्रसिद्ध उद्योगपती हाजी इकबाल शेठ पटेल आदी मान्यवर नमाज अदा करण्यासाठी उपस्थित होते.

बार्शी नगरपालिकेने नमाज स्थळी स्वच्छतेची विशेष व्यवस्था केली होती, त्याबद्दल नगरपालिका प्रशासक बाळासाहेब चव्हाण आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

तसेच, DYSP डीवायएसपी नालकुल साहेब बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी कुकडे यांनी नामाजाच्या वेळी उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा वाढवली.
यावेळी नगरपालिका प्रशासनाचे बाळासाहेब चव्हाण यांचे देखील ईदगाह कमिटीच्या वतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मौलानांचा सत्कार हाजी शफिक नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच समीर वलसंगकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.