जागतिक क्षयरोग दिनानिमित्त परंड्यात माहितीपर कार्यक्रम संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
परंडा (स्टार माझा न्यूज) – जागतिक क्षयरोग दिनानिमित्त (24 मार्च 2025) उपजिल्हा रुग्णालय परंडा, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परंडा आणि बावची विद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.



या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. आनंद मोरे (वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय परंडा) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना क्षयरोगासंबंधी सविस्तर माहिती दिली. यावर्षीच्या जागतिक क्षयरोग दिनाची संकल्पना “YES! WE CAN END TB – Commit, Invest, Deliver” म्हणजेच “होय! आपण क्षयरोग निश्चितपणे संपवू शकतो – प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा द्या” यावर आधारित होती.

कार्यक्रमातील महत्त्वाचे मुद्दे:

क्षयरोगाची लक्षणे व निदान: क्षयरोगाचे सुरुवातीचे लक्षणे कोणती असतात आणि वेळीच निदान कसे करता येते याची माहिती देण्यात आली.



तपासण्या व उपचार: क्षयरुग्णांसाठी विविध मोफत तपासण्या आणि औषधोपचार कसे उपलब्ध आहेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

टीबी मुक्त भारत अभियान: पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियान, टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान यांची माहिती देण्यात आली.

निक्षय मित्र संकल्पना: क्षयरुग्णांना पोषण आहार मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या निक्षय पोषण योजने अंतर्गत दरमहा ₹1000 भत्ता दिला जात असल्याची माहिती देण्यात आली.



रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी व उपचार: क्षयरुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींसाठी तपासणी आणि प्रतिबंधात्मक औषधे मोफत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.


उपस्थित मान्यवर:

कार्यक्रमाला डॉ. विकास पवार (वैद्यकीय अधिकारी/प्रोग्राम मॅनेजर, तालुका आरोग्य कार्यालय परंडा) व श्री. दत्तात्रय आडसूळ (तालुका क्षयरोग औषधोपचार पर्यवेक्षक, THO ऑफिस परंडा) यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी तालुक्यातील सध्या उपचार घेत असलेल्या क्षयरुग्णांबाबत माहिती दिली तसेच शासकीय रुग्णालयात क्षयरोगावरील मोफत उपचार सुविधा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले.



विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

बावची विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. नारायण खैरे सर व संपूर्ण शिक्षकवृंदांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. शेवटी श्री. वाघमारे सर यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.

या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये क्षयरोगाबद्दल जनजागृती निर्माण झाली असून, टीबी मुक्त भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!