स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
बार्शी प्रतिनिधी- दिनांक 24 श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी यांच्यातर्फे दिनांक २४ मार्च २०२५ वार सोमवार या दिवशी विद्यार्थी करिअर मार्गदर्शन प्रोग्राम व गुणवंतांचा सत्कार या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ.गणपतराव मोरे उपसंचालक लातूर विभाग हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव पी टी पाटील हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांची ओळख जीवशास्त्र विभाग प्रमुख यु.एच.क्षीरसागर यांनी करून दिली.
या कार्यक्रमादरम्यान डॉ.गणपतराव मोरे यांनी दहावीनंतर मुलांनी करिअर कस घडवायचे या बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
पी.टी पाटील यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना करियर संदर्भात मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, विज्ञान विभाग प्रमुख आर.एस.पाटील उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता देव यांनी केले तर आभार प्रदर्शन कला विभाग प्रमुख संजय बागल यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.