स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
परांडा – उपजिल्हा रुग्णालय परांडा व डॉ. सचिन बोटे किडनी केअर सेंटर, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मूत्ररोग व मुतखडा आजार निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून हे शिबिर पार पडले.
शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन करण्यात आले. यावेळी डॉ. सचिन बोटे, डॉ. नलिनी बोटे, डॉ. विश्वेश कुलकर्णी, डॉ. गजानन शेटे, डॉ. दयानंद पाटील, डॉ. इफात कोरबू, डॉ. आनंद मोरे यांनी मार्गदर्शन केले.
शिबिराचा उद्देश व लाभ
गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत असून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास मूत्रसंस्थेशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. यामध्ये लघवीला आग होणे, मुतखडा होणे, पोटदुखी, लघवीतून रक्त जाणे, अंडाशयाला सूज येणे अशा विविध समस्यांचा समावेश आहे. या आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी आणि मोफत निदान-उपचार देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचा 174 रुग्णांनी लाभ घेतला. त्यामध्ये 108 पुरुष आणि 66 महिलांचा समावेश होता. शिबिरात आधुनिक तसेच आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब करून आवश्यक तपासण्या करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तानाजी गुंजाळ यांनी केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.






Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.